बांबरुड (राणीचे )येथे आषाढी एकादशी निमित्त मोफत आयुर्वेद व पंचकर्माचे शिबीर

बांबरुड (राणीचे )येथे आषाढी एकादशी निमित्त मोफत आयुर्वेद व पंचकर्माचे शिबीर

नांद्रा(ता.पाचोरा)ता.12बांबरुड (राणीचे )येथे आषाढी एकादशी निमित्ताने डॉ.हर्षल महाले व डॉ प्राजक्ता महाले यांच्या नवजीवन हॉस्पिटल बांबरुड (रा) तर्फे गावात आयुर्वेद व पंचकर्माचे मोफत शिबीर घेण्यात आले . शिबिराच्या सुरवातीला श्री.दिलीप महाले सर (मुख्याध्यापक) यांच्या हस्ते आषाढी एकादशी निमित्ताने आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी देवांची आरती करून, दीपप्रज्वलन करण्यात आले व नंतर गावातील सर्व भजनी मंडळींचा सत्कार करण्यात आला. गावाकडे पंचकर्म हा विषय नवीन होता परंतु आता खेड्यात देखील आपल्याला आयुर्वेद व पंचकर्माचा उपचार मिळणार म्हणून सर्व पंचक्रोशीतील गावकऱ्यांनमध्ये शिबिराबद्दल उत्साहाचे वातावरण दिसुन आले , शेवटी वेळेअभावी परंतु तब्बल 250 लोकांनी मोफत तपासणी व मोफत औषधे घेतली तसेच सहकार्य भावना म्हणून बचत गटाच्या कोमल अरुण जावळे व अनिता हिरालाल भदाणे यांनी सहकार्य लाभले.
डॉ.हर्षल व डॉ.प्राजक्ता यांच्या नवजीवन हॉस्पिटल तर्फे आता पुढे देखील आयुर्वेद व पंचकर्माचे उपचार बांबरुड (रा) गावात उपलब्ध झाले आहेत. या कार्यक्रमाला गावातील मंडळीची भरपूर प्रमाणात उपस्थिती होती.