प्रकाश तेली यांच्या “वोट-2” काव्य संग्रहाचे राष्ट्रीय मतदार दिनी प्रकाशन

प्रकाश तेली यांच्या “वोट-2” काव्य संग्रहाचे राष्ट्रीय मतदार दिनी प्रकाशन

जळगाव :- कवी लेखक व पत्रकार प्रकाश रामदास तेली यांनी लिहिलेल्या वोट-2 ह्या हिंदी काव्य संग्रहाचे 25 जानेवारी 2023 रोजी राष्ट्रीय मतदान दिनी नाहाटा कॉलेज भुसावळ येथे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हा निवडणुक अधिकारी तुकाराम हुलवळे, आप्पासाहेब रामदास सुकलाल तेली, कवी प्रकाश रामदास तेली, उप वनसरंक्षक विवेक होशिंग, नाहाटा कॉलेजचे प्राचार्य एस.व्ही. पाटील, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डांगर, भुसावळचे प्रांतधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दिपक धिवरे, अ‍ॅड. किरण तेली व मान्यवरांच्या हस्ते भुसावळ येथे झाले

प्रकाश तेली यांनी मतदानावर 170 लिहिलेल्या असून 400 पेक्षा जास्त घोष वाक्य (कोट्स) लिहिलेले आहेत तेली यांच्या मतदानावरील काव्य व घोष वाक्य (कोट्स) लिहिण्याचा हा विश्वविक्रम आहे कारण मतदानावर आज पर्यंत इतक्या कविता व घोषवाक्य कोणीच लिहिलेले नाहीत. प्रकाश तेली यांच्या वोट काव्य संग्रहाचे २०२२ मध्ये प्रकाशन झालेले असून भविष्यात वोट-3 व वोट चे कोट्स हे पुस्तके सुद्धा वाचकाकरीता आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या कडून वोट – 2 काव्य संग्रहाचे कौतुक :-

वोट-2 काव्य संग्रह मतदानाचे महत्व, मतदान जनजागृती अभियानास हातभार लावणार तसेच दिशा देणार काव्य संग्रह आहे ह्या काव्य संग्रहाचे दूरगामी परिणाम हे दिसून येतील तसेच येणार्या पीढ़ीस हा काव्य संग्रह मार्गदर्शन करेल आणि प्रत्येक विद्यार्थी व मोठ्यांनी सुद्धा हा काव्य संग्रह वाचला पाहिजे असे आपल्या शुभकामना संदेशात श्रीकांत देशपांडे अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी म्हटले आहे.

प्रकाश रामदास तेली यांनी विविध सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर 5000 पेक्षा जास्त कविता व 6000 पेक्षा जास्त सामाजिक कोट्स लिहिलेले आहेत कविता व कोट्स लिहून समाज प्रबोधन करुन समाजाला जागृत करणे त्यांना आवडते.

अनेक मान्यवरांकाडून प्रकाश तेली यांच्या काव्याचे कौतुक:-

प्रकाश तेली यांच्या लेखन कार्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पद्मश्री भालचंद्र नेमाडे, मंत्री, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनेक केंद्रीय मंत्री, अधिकारी व पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे.

जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवस ह्या वर्षी नाहाटा कॉलेज भुसावळ येथे उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला सदर कार्यक्रम प्रसंगी निवडणुक शाखेतील अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच नाहटा कॉलेजचे प्राध्यापक, व कर्मचारी तसेच विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.