पाचोरा श्री.गो.से. हायस्कूल विद्यालयास सु.भा. पाटील प्राथमिक विद्या मंदिर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची भेट

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूल विद्यालयास सु.भा. पाटील प्राथमिक विद्या मंदिर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची भेट

पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा शहरातील सुपडू भादू पाटील विद्यामंदिर विद्यार्थ्यांची श्री गो.से हायस्कूलला सस्नेह भेट विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरली .यावेळी इ.४ थी विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा सहभाग घेऊन बक्षीस मिळवली. विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल व उत्साह दिसून आला, विद्यार्थी भारावले होते पुढच्या वर्षी आपल्याला याच शाळेत यायचे असल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. शाळेची भव्य इमारत , क्रीडांगण, ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगीत दालन, संगणक हॉल, कलादालन व तेथील कलाकृती पाहून विद्यार्थी भारावले. विद्यार्थ्यांचे स्वागत व प्रमुख मार्गदर्शक मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक एन आर पाटील यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.आर बी बोरसे यांनी विद्यार्थ्यांना शाळेविषयी शाळेतील विविध उपक्रमाबद्दल व शिक्षकांविषयी माहिती दिली शाळेत विविध उपक्रम कसे साजरी करतात याची माहिती दिली. रंगभरण चित्रकला स्पर्धेत मुलांमध्ये कुंदन परदेशी, व मुलींमध्ये दीप्ती शिंदे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली. मुलांमधून 10 व मुलींमधून दहा अशी वीस बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आली.
प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये विजयी झालेले विद्यार्थी ईश्वर उईके, वैदेही खेळणार ,प्रणय शिंदे,भावेश चौधरी, विश्वशील आखाडे,तुषार पाटील,निरामय तायडे इत्यादी विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवली. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची यशोगाथा शाळेतील विविध उपक्रमाबद्दल सांगून विद्यार्थ्यांना पुढील वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, उपमुख्याध्यापक एन आर पाटील, कलाशिक्षक सुनील भिवसने, सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, ज्योती पाटील यांनी चित्रकला स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली, प्रश्नमंजुषा स्पर्धेत वैशाली कुमावत, शितल महाजन यांनी सहकार्य केले. यावेळी सुपडू भादू पाटील विद्या मंदिराचे
मुख्याध्यापक अशोक परदेशी, दीपक पाटील,
जयश्री पाटील, योगिता ठाकूर , शीतल पाटील ,माने सर, महेश लोखंडे, आशिष पाटील, भुषण पाटील . एन. एस. पाटील इत्यादी शिक्षकांनी सहकार्य केले सूत्रसंचालन आर बी बोरसे तर आभार कलाशिक्षक प्रमोद पाटील यांनी मानले.