Home महाराष्ट्र पाथर्डी पोलिसांनी जप्त केलेली आणि बेवारस स्थितीत असलेली वाहने घेऊन जाण्याचे पोलिस...

पाथर्डी पोलिसांनी जप्त केलेली आणि बेवारस स्थितीत असलेली वाहने घेऊन जाण्याचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांचे आवाहन

पाथर्डी पोलिसांनी जप्त केलेली आणि बेवारस स्थितीत असलेली वाहने घेऊन जाण्याचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांचे आवाहन

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

पाथर्डी पोलिसांनी जप्त केलेली आणि बेवारस स्थितीत असलेली वाहने घेऊन जाण्याचे पाथर्डी पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी पाथर्डी तालुक्यातील जनतेला आवाहन केले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलिस स्टेशनच्या आवारात अनेक दिवसांपासून अनेक वाहने बेवारस अवस्थेत पडलेली आहेत.त्यामध्ये दूचाकी,तिनचाकी,चारचाकी वाहनाचा समावेश आहे.संबंधित वाहनांच्या मालकांनी सदर वाहनांची कागदपत्रे दाखवून आपली वाहने आठ दिवसांत घेऊन जावीत अन्यथा सदर वाहनावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून सदर वाहनांची विल्हेवाट लावली जाईल.असे आवाहन पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी केले आहे.पाथर्डी येथील पोलिस स्टेशनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गुन्ह्यात, अपघातात, आणि बेवारस अवस्थेत पडलेली आहेत.सदर वाहने ही खराब होत चाललेली आहेत.या बाबत अनेक वेळा वाहन धारक मालक यांना

आवाहन करूनही ती वाहने घेऊन गेलेले नाहीत. ही बातमी प्रसिद्ध झाल्या पासून आठ दिवसांत ही वाहने घेऊन जावीत अन्यथा सदर वाहनावर योग्य ती कारवाई करून सदर वाहनांची विल्हेवाट लावली जाईल.नंतर काही एक तक्रार चालणार नाही.वाहन धारकांनी आपली वाहने त्वरित घेऊन जावीत जर वाहने नेली नाहीत तर पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करतील मग नंतर कोणत्याही प्रकारची तक्रार चालणार नाही.असे पाथर्डी पोलिस स्टेशनच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Don`t copy text!