राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार पाचोरा दौऱ्यावर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था पाचोरा संस्थेतील इमारत व रंगमंचाचे उद्घाटनासाठी प्रमुख उपस्थिती

राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार पाचोरा दौऱ्यावर
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था पाचोरा संस्थेतील इमारत व रंगमंचाचे उद्घाटनासाठी प्रमुख उपस्थिती

पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण
संस्था संचलित श्री शेठ मुरलीधर मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र इमारत तसेच श्री. गो.से हायस्कूल मध्ये प्रांगणात सेवानिवृत्त शिक्षक अभिमन्यू दशरथ पाटील यांच्या नावाने जिजाई रंगमंच उद्घाटन समारंभ दिनांक 15 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी 10.30 वाजता. आयोजित केलेला आहे इमारतीचे उद्घाटन समारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. श्री. गो.से हायस्कूल. जिजाई रंगमंचाचे उद्घाटन माजी मंत्री व आमदार विधान परिषद एकनाथ रावजी खडसे यांच्या शुभ हस्ते आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण भाई गुजराती हे राहणार आहे कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून माजी खासदार वसंतराव मोरे, जळगाव निरीक्षक अविनाशजी आदिक, माझी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माझी मंत्री सतीश अण्णा पाटील, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार राजीव दादा देशमुख, माजी आमदार मनीष दादा जैन , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून रोहिणी ताई खडसे येवलकर, गजानन पाटील, माजी आमदार अरुण पाटील, संतोष चौधरी, दिलीप सोनवणे, संजय दादा गरुड, महिला अध्यक्ष वंदना चौधरी, एजाज भाई मलिक, कार्याध्यक्ष विलास पाटील, युवक अध्यक्ष रवींद्र पाटील, अरविंद मानकरी, प्रवक्ते योगेश देसले, संतोष चव्हाण, जयवंतराव पाटील उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार दिलीप ओंकार वाघ अध्यक्ष पि.टी.सी., यांच्या प्रमुख उपस्थितीत चेअरमन संजय नाना वाघ, मानद सचिव महेश देशमुख, व्हाईस चेअरमन विलास जोशी, स्थानिक व्यवस्थापन समिती चेअरमन सुरेश देवरे, सर्व संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे . तरी उपस्थित रहावे संस्थेतर्फे करण्यात आले आहे.