Home पाचोरा तालुका सिंघम तलाठी अतुल देवरे यांच्या पाठीशी बाळदकर खंबीर; भाजपचे प्रमोद सोमवंशी यांचा...

सिंघम तलाठी अतुल देवरे यांच्या पाठीशी बाळदकर खंबीर; भाजपचे प्रमोद सोमवंशी यांचा इशारा

सिंघम तलाठी अतुल देवरे यांच्या पाठीशी बाळदकर खंबीर; भाजपचे प्रमोद सोमवंशी यांचा इशारा

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदनामी खपवून घेणार नाही; १५ एप्रिल रोजी प्रशासनाला निवेदन देणार

 

 

 

पाचोरा (प्रतिनिधी) :भारतीय सैन्य दलात १८ वर्षे देशसेवा बजावून महसूल विभागात रुजू झालेले आणि आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे ‘सिंघम’ म्हणून ओळख निर्माण करणारे तलाठी अतुल देवरे यांच्या पाठीशी संपूर्ण बाळद गाव खंबीरपणे उभे आहे. “चांगली कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्याची बदनामी करण्याचा डाव आम्ही हाणून पाडू,” असा इशारा भाजपचे प्रमोद सोमवंशी यांनी दिला आहे.

अतुल देवरे यांनी अत्यंत कमी काळात अवैध वाळू वाहतूक, अवैध मुरूम उपसा यांविरुद्ध कडक पावले उचलली आहेत. तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने ते उत्कृष्ट कार्य करत आहेत. मात्र, त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे अस्वस्थ झालेल्या काही घटकांकडून त्यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप सोमवंशी यांनी केला आहे.

CDR काढण्याची मागणी :

प्रमोद सोमवंशी यांनी पुढे म्हटले की, “चांगली कामगिरी करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांचे सीडीआर (CDR) तपासण्यापूर्वी, जे लोक वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-डंपरवर कारवाई करू नये म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात, त्यांचे फोन डिटेल्स तपासले पाहिजेत. अशा दबाव आणणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येण्यासाठी त्यांचाही सीडीआर काढण्याची आमची मागणी आहे.”

१५ एप्रिल रोजी निवेदन :

अतुल देवरे यांच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या कामाला बळ देण्यासाठी बाळद ग्रामस्थांच्या वतीने दिनांक १५ एप्रिल रोजी प्रशासनाला विशेष निवेदन देण्यात येणार आहे. “प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खचू देणार नाही,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

आज (दि.११) रोजी बाळद करांनी नायब तहसीलदार व प्रांताधिकारी भुषण अहिरे यांना निवेदन देण्यात आले आहे की अशा कार्यतत्पर ग्राम महसूल अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी तुळशिराम ओंकार मोरे (भोमानाना मोरे), विलास मोरे, अविनाश सुभाष पाटील लोक काहीही आरोप करतील परंतु अतुल देवरे ग्राम महसूल अधिकारी अत्यंत शिस्तप्रिय आहे.आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे निवेदन आज पाचोरा प्रांताधिकारी भुषण अहिरे यांना देण्यात आले.तलाठी संघटनांनी सुद्धा वारंवार होत असलेल्या तलाठ्यांवर होत असलेल्या हल्ल्याचा विरोधात कोणतीही कठोर कारवाई होत नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

Don`t copy text!