Home महाराष्ट्र राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

 

 

 

सोयगाव प्रतिनिधी : दत्तात्रय काटोले

सोयगाव तालुक्यातील प्रा. शा. रामजी नगर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जयंतीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेतील मुलींनी राजमाता जिजाऊ यांचा पोशाख परिधान करून कार्यक्रमात सहभाग घेतला, तर विद्यार्थ्यांनी दोन्ही थोर विभूतींच्या जीवनकार्याचे सादरीकरण केले.

या कार्यक्रमप्रसंगी मुख्याध्यापक काटोले सर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी जिजामातांच्या संस्कारातून घडलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व व स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या पिढीसाठी किती महत्त्वाचे आहेत, यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मनोज आगे, सदस्य वमनिषा जेठे, वैशाली इंगळे, भास्कर श्रीखंडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. राजू कुडके तसेच शाळेचे शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गोपाल चौधरी सर यांनी केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, संस्कार व आदर्श मूल्यांची जाणीव निर्माण झाली.

Don`t copy text!