अ.भा.प्रहार न्यायमंच आश्रमशाळा संघटना जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर

अ.भा.प्रहार न्यायमंच आश्रमशाळा संघटना जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर

इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत सुरु असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या सेवा विषयक समस्या जिल्हा स्तरावर मांडण्यासाठी व सोडविण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख मार्गदर्शनात, संघटनेचे राज्याध्यक्ष महेश डवरे व राज्य सचिव हेमंत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. कार्यकारणीत जिल्हाध्यक्ष स्थानी आबा पाटील – जिल्हाध्यक्ष, सतीश वाघ – उप जिल्हाध्यक्ष, प्रकाश पाटील – सचिव, प्रमोद निकुंभे – सह सचिव, सर्जेराव पाटील – कार्याध्यक्ष, अनिल आहिरे – सह कार्याध्यक्ष, संजय पाटील – संपर्क प्रमुख, नितीन चव्हाण – प्रसिद्धी प्रमुख, अरुण परदेशी – संघटक, धनंजय सैंदाने – सदस्य, सचिन काकडे – सदस्य, जगन्नाथ वाणी – सदस्य यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जिल्ह्याच्या नूतन कार्यकारिणीस प्रामाणिक कार्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.