खेडगाव नंदीचे येथे जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांच्या प्रयत्नातुन प्राथमिक आरोग्य केंद्राचे भुमिपुजन सोहळा संपन्न

खेडगाव नंदीचे येथे जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांच्या प्रयत्नातुन प्राथमिक आरोग्य केंद्राचे भुमिपुजन सोहळा संपन्न

आदर्शगाव पाटोदा सरपंच भास्कररावजी पेरे पाटील आणि आमदार किशोरआप्पा पाटील व आमदार गिरीशभाऊ महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना ताई पाटील, उपविभागीय अधिकारी विक्रमी बांदल व तहसिलदार कैलास जी चावडे,बिडीओ अतुल पाटील,डाॅ.समाधान वाघ,गर्जा महाराष्ट्र न्युज चे अध्यक्ष अनिल भाऊ महाजन,अस्मिताताई पाटील,जि.प सदस्य रावसाहेब पाटील,मधुभाऊ काटे,दिपकदादा राजपुत,संजय पाटील,अरूण पाटील, किशोर बारवकर सह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

अनंत चतुर्दशी असुन सुध्दा भुमिपुजन सोहळ्याला मान्यवरांसह परीसरातील नागरीकांचा उत्स्फुर्त असा प्रतिसाद

*पाचोरा प्रतिनिधी :* अनंत चतुर्दशी च्या पावन मुहुर्तावर जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांच्या प्रयत्नातून होणारे खेडगाव नंदीचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे भुमिपुजन आज आमदार किशोरआप्पा पाटील व आमदार गिरीशभाऊ पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदर्शगाव पाटोदा येथील सरपंच भास्कररावजी पेरे-पाटील यांनी उपस्थित परीसरातील सर्व सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना आपल्या भाषण कौशल्यातुन केलेल्या कामांचा व आलेल्या अडचणींची माहिती दिली आणि अडचणी सर्वांसमोर असतात फक्त ते सांगत राहण्यापेक्षा सोडवण्यासाठी भर देणे महत्वाचे आहे.आदर्शगाव बनवण्यासाठी फक्त पैसा’च महत्वाचा नसुन काम करून दाखवण्याची इच्छाशक्ती महत्वाची असते असा कानमंत्र दिला.

जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांनी आपल्या कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटात असंख्य असा विविध फंडातुन निधी उभारून जास्तीत कामे करण्याचा प्रयत्न केला आहे असे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी कौतुक केले.

तर पदमबापु हे चालते-बोलते दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे असे आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी भावना व्यक्त केली.

भुमिपुजन सोहळा संपन्न झाल्यानंतर – आमदार किशोरआप्पा पाटील व आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी एकाच ठिकाणी एकत्र बसुन स्नेहभोजनाचा आनंद घेतला.विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दोघी मान्यवर या कार्यक्रमाच्या माध्यमातुन पुन्हा एकत्र आले.आगामी कुठलेही राजकीय परीस्थिती’वर चर्चा व टोलेबाजी न झाल्याने उत्सुकतेने आलेले उपस्थितांची हिरमोड झाली.

आज जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांनी यशस्वीपणे घेतलेल्या फार मोठ्या कार्यक्रमामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार आपणचं आहोत असे शक्ती प्रदर्शन दाखवुन दिले आहे.या शक्ती प्रदर्शनामुळे इच्छुक मंडळींची हिरमोड चेहर्यावरून जाणवत होती तर काहींनी निराशेपोटी कार्यक्रमाला गैरहजेरी दाखवली.तर पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे महत्वाची बैठकीत अडकल्याने वेळेवर उपस्थित राहु शकले नाहीत.

यावेळी आदर्शगाव पाटोदा सरपंच भास्कररावजी पेरे पाटील आणि आमदार किशोरआप्पा पाटील व आमदार गिरीशभाऊ महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना ताई पाटील, उपविभागीय अधिकारी विक्रमी बांदल व तहसिलदार कैलास जी चावडे,बिडीओ अतुल पाटील,डाॅ.समाधान वाघ,गर्जा महाराष्ट्र न्युज चे अध्यक्ष अनिल भाऊ महाजन,अस्मिताताई पाटील,जि.प सदस्य रावसाहेब पाटील,मधुभाऊ काटे,दिपकदादा राजपुत,संजय पाटील,अरूण पाटील, शहरप्रमुख किशोर बारवकर उपविभागीय अभियंता नंदकुमार पवार,कार्यकारी अभियंता एस जी धिवरे सह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच भुमिपुजन सोहळ्याला परीसरातील सर्व शिवसेना, युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते व सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालाजी ग्रुप पाचोरा यांनी अनमोल सहकार्य दिले.