शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्चचा बी.फार्म. द्वितीय सत्र 2025 परीक्षेत 100 टक्के निकाल

शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्चचा बी.फार्म. द्वितीय सत्र 2025 परीक्षेत 100 टक्के निकाल

 

 

 

पाचोरा : गिरनाई शिक्षण संस्थेच्या शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च, पाचोरा यांच्या बी.फार्म. द्वितीय सत्र 2025 च्या निकालात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत संस्थेने १०० टक्के निकाल लावला आहे.

 

या परीक्षेत गुंजाळ वेदांत रंजीत यांनी CGPA 8.38 मिळवून प्रथम क्रमांक, पाटील साक्षी भगवन यांनी CGPA 7.79 मिळवून द्वितीय क्रमांक, तर सुतार ईश्वर शंकरराव यांनी CGPA 7.66 मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे डॉ. मनोज दिलीप पाटील यांचे मार्गदर्शन व प्राध्यापक वर्गांनी घेतलेली मेहनत अतिशय महत्त्वाची ठरली.

 

विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, सेक्रेटरी ॲड. जे. डी. काटकर, जॉईंट सेक्रेटरी प्रा. शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष श्री. नीरज मुनोत, प्राचार्य डॉ. मनोज दिलीप पाटील तसेच सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.