नवजीवन विद्यालय पाचोरा येथे बीएड छात्र अध्यापकांचा निरोप समारंभ संपन्न
पाचोरा येथील सुमनताई पाटील बीएड अध्यापक विद्यालयातील छात्रअध्यापकांचा आंतरवासिता काळ सुरू होता. छात्राध्यापकांचा साडेतीन महिन्याचा आंतरवासिता कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास सुमनताई पाटील कॉलेजचे प्राध्यापक तथा नवजीवन विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते. प्रसंगी ज्ञानदेवता सरस्वती मातेच्या पूजनानंतर छात्र अध्यापिका धनश्री कपाटे, स्वाती पाटील, भाग्यश्री बागुल, मानसी जाधव, दिपाली पाटील यांनी स्वागत गीत सादर केले व मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघा पवार यांनी केले. यानंतर आंतरवासिता काळात छात्रअध्यापकांना आलेले अनुभव व्यक्त करतांना धनश्री कपाटे, स्वाती पाटील, रोशनी चौधरी, दिपाली पाटील, पूजा परदेशी भाग्यश्री बागुल यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विद्यालयातील शिक्षक विकास पाटील यांच्यातर्फे सर्व छात्रअध्यापकांना डायरी भेट देण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी पर्यवेक्षक आर वाय चौधरी, आर ए साळुंखे, सुधाकर पाटील, एस ए पाटील, मनोज पाटील, अस्मिता फाउंडेशनचे प्रा. श्री लंगरे, प्रा. लता परदेशी, प्रा. दिगंबर पाटील प्रा. शेख यांनी मनोगत व्यक्त करत छात्रअध्यापकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्रअध्यापिका निकिता बोरसे व काजल सोनकूळ यांनी केले. तर आभार रोशनी चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व छात्र अध्यापकांनी परिश्रम घेतले.

























