श्री.गो.से.हायस्कूल येथे शालेय सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

श्री.गो.से.हायस्कूल येथे शालेय सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

 

 

पाचोरा प्रतिनिधी

आज दिनांक 27/01/2025 सोमवार रोजी श्री. गो.से.हायस्कूल.मध्ये शालेय सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार संपन्न झाली सर्वप्रथम या कार्यशाळा प्रशिक्षणाचे मुख्य प्रशिक्षक सतीश कांबळे यांचे स्वागत विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर.एल. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. पथकातील इतर सहाय्यक रवींद्र पाटील व आकाश चौधरी यांचे स्वागत विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ.ए.आर.गोहिल व पर्यवेक्षक आर. बी.तडवी.यांनी केले.

दैनंदिन जीवनामध्ये आग लागणे,महापूर, भूकंप अशा विविध आपत्ती येत असतात.अशा प्रसंगी जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने काय काळजी घ्यावी.तसेच आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन,प्रथमोपचार व कमीत कमी वेळात शाळेची इमारत रिकामी करणे या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष करून दाखविण्यात आले.

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका तसेच पालक वर्ग देखील उपस्थित होते. सदर प्रशिक्षण कार्यशाळेचे सूत्रसंचालन रुपेश पाटील यांनी व आभार प्रदर्शन एस. एल.वाघ.सर यांनी केले.