पाचोऱ्यात बुधवारी ‘मान हळदी कुंकुवाच्या सन्मान सौभाग्याचा’ कार्यक्रम

पाचोऱ्यात बुधवारी ‘मान हळदी कुंकुवाच्या सन्मान सौभाग्याचा’ कार्यक्रम

आ.किशोर पाटील फाउंडेशनकडून महिलांसाठी हळदी कुंकवाचे आयोजन उपस्थितीचे आवाहन

पाचोरा( वार्ताहर) दि,२४
मकर संक्रांतीचे औचित्य साधत पाचोऱ्यात आमदार किशोर अप्पा पाटील फाउंडेशनच्या वतीने महिला भगिनींसाठी ‘मान हळदी कुंकुवाच्या सन्मान सौभाग्याचा ‘अशी टॅग लाइन वापरत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.बुधवारी दुपारी चार वाजता चिंतामणी कॉलनी भागातील शिवालय या आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या निवासस्थाना शेजारील शिवतीर्थ येथे हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील यांनी दिली असून महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.महिलांच्या सौभाग्याचे लेणे असलेले हळदी कुंकू व तत्सम अनेक कार्यक्रम वेळोवेळी महिला भगिनींसाठी आम्ही घेत असतो त्याचाच एक भाग म्हणून यंदाही महिलांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करता येणार आहे. घरातील विविध जबाबदाऱ्यांमुळे महिलांना घराबाहेर पडणे फारसे शक्य होत नाही तसेच कोरोना मुळे देखील अनेक प्रतिबंध असल्याने कोणतेही कार्यक्रम जाहीर स्वरूपाचे होऊ शकले नव्हते म्हणून नुकताच भडगाव शहरात देखील आमदार किशोर अप्पा पाटील फाउंडेशनच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला होता या कार्यक्रमाला देखील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.दरम्यान बुधवारी होणाऱ्या या हळदी कुंकवाला देखील महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ मनोरंजन व वाण म्हणून आकर्षक भेट वस्तू दिली जाणार असून महिलांना एक आनंदोत्सव साजरा करण्याची संधी या निमित्ताने मिळणार असल्याने मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आमदार किशोर अप्पा पाटील फाउंडेशनच्या वतीने माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील यांनी केले आहे.