राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे इधनं दर वाढी विरोधात मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन

राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे इधनं दर वाढी विरोधात मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन

( पाचोरा प्रतिनिधी )

आम्ही पाचोरा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते,
माजी आ.श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला जनतेच्या ज्वलंत मागण्यांच्या

संदर्भात केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाचे विरोधात निवेदन सादर करण्यासाठी आपल्या कार्यालयासमोर आलेलो आहोत. अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये सध्या सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक यांना जीवन जगावे लागत आहे. या कठीण परिस्थितीत आमच्या जीवन-मरणाशी

संबंधित मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याकडे सुपूर्त करत आहोत.

जनतेच्या मागण्या

1) डिझेल, पेट्रोल व स्वयंपाकाचा गॅस अश्या विविध पेट्रोलजन्य इंधनाचे व खाद्य तेलाचे भाव सातत्याने गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रासदायक भार सहन करावा लागत आहे. तरी सर्व प्रकारच्या इंधनाचे भाव त्वरित कमी करण्यात यावे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव सातत्याने वाढत असून या महागाईची झळ सर्व सामान्य जनतेला सोसावी लागत आहे. या बाबत केंद्र शासनाने नियोजन करून दरवाढ नियंत्रित करावी. यावेळी निवेदन देताना माजी आ. दिलीप भाऊ वाघ,तालुका अध्यक्ष विकास पाटील सर,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे,सत्तार पिंजारी,नाना देवरे,प्रकाश पाटील,बशीर दादा ,रामधन परदेशी,सय्यद तारीख,भोला आप्पा,रणजित पाटील सर,भगवान मिस्तरी, डी एस पाटील ,हारून दादा देशमुख,गौरव वाघ,अविनाश सुतार,अभिजीत पवार,मौजू शेठ,पंकज गढरी,पिंटू भामरे,सुदर्शन सोनवणे,सचिन शिंदे,जय सुतार,विक्रांत पाटील सर,किरण देवरे,शांताराम भुजबळ,गोपी पाटील,अविनाश सुतार,प्रशांत माळी,रज्जू बागवान,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते