एक पेड मा के नाम उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी महत्वाचा -गट शिक्षणाधिकारी विजय पवार 10 शाळांचा झाला सन्मान
पाचोरा – एक पेड मा के नाम या केंद्र शासनाच्या उपक्रमाला पाचोरा तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून शालेय विद्यार्थ्यांनी सुमारे 12688 रोपांची लागवड अभियान काळात केली. 240 शाळांनी इको क्लबची स्थापना शालेय पातळीवर केली आहे. गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी शाळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एक पेड मा के नाम उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दहा शाळांचा अभिनंदन पत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.
” एक पेड मा के नाम ” हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम,मातृ प्रेम, पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीची जाणीव या उपक्रमातून होईल, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी याप्रसंगी केले. सदर कार्यक्रमाला शा पो आ अधीक्षक सरोज गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी समाधान पाटील,केंद्र प्रमुख शांताराम वानखेडे, अभिजित खैरनार, संगणक प्रोग्रामर योगेश अहिरराव, विषय तज्ञ गिरीश भोयर, सुनील शिवदे यांची उपस्थिती होती. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शाळा व लावलेली रोपे पुढील प्रमाणे-
1पी के शिंदे विद्यालय पाचोरा 1035
2एस पी शिंदे विद्यालय पाचोरा 715
3जी एस हायस्कूल पाचोरा 703
4सु भा प्राथ पाचोरा 453
5न्यू इंग्लिश मिडीयम पाचोरा 382
6सिंधुताई शिंदे विद्यालय पाचोरा 329
7ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव हरे 327
8खाजगी प्राथ नगर देवळा 298
9माध्य विद्यालय शिंदाड 259
10जि प शाळा वरखेडी 247