पाचोरा महसुल विभागातील नांद्रा मंडळात कालबाह्य नोंदी कमी करणे बाबत शिबीर

पाचोरा महसुल विभागातील नांद्रा मंडळात कालबाह्य नोंदी कमी करणे बाबत शिबीर

नांद्रा (ता.पाचोरा )ता.17 पाचोरा महसुल विभागातील नांद्रा येथील मंडळअधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रम बांदल व तहसिलदार कैलास चावडे यांच्या मार्गदर्शनाने शेतकऱ्यांच्या सातबारा वरील इतर अधिकारातील कालबाह्य नोंदी कमी करण्यासाठीच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी यांना कालबाह्य नोंदी कमी करून संगणकीकृत सातबारा वितरित करण्यात आले तसेच ई-पीक पहाणी बाबत मार्गदर्शन करण्यात आले. नांद्रा मंडळ अधिकारी प्रशांत पगार ,मंडळातील तलाठी नदीम शेख ,दीपक दवंगे , कैलास बहीर, सुनिल राजपूत ,गणेश गायकवाड यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. फोटो ………….नांद्रा (ता.पाचोरा )येथील मंडळाधिकारी कार्यालयात सातबारा वरील कालबाह्य नोंदी कमी करुण संगणककृत सातबारा वाटप करतांना उपविभागीय अधिकारी डाँ.विक्रम बांदल,तहसिलदार कैलास चावडे,शेतकरी प्रशांत सुर्यवंशी .