पाचोऱ्याची पूजा पाटील ची सारंगखेडा येथील प्रदर्शनात ज्यूरी पुरस्कारासाठी निवड
पाचोरा ( प्रतिनिधी )
सारंगखेडा येथे यात्रेत दरवर्षी घोड्यांचा बाजार प्रचंड मोठ्या प्रमाणात होतो.या ठिकाणी चेतक फेस्टिवल राष्ट्रीय चित्र व शिल्प स्पर्धा व प्रदर्शन भरविण्यात येते. भारतातून 20 राज्यातून चित्रांचा सहभागहोतो त्यापैकी अंतिमफेरी साठी व चित्रप्रदर्शनासाठी चित्रांची निवड केली जाते.त्यातून चित्रांची निवड पुरस्कारासाठी काढली जातात. रंगश्री आर्ट फाऊंडेशन नेया वर्षी 13कलाकृती स्पर्धे साठी पाठविल्या होत्या.
पाचोरा येथील रंगश्री ची विदयार्थीनी
कु. पूजा विजय पाटील हिच्या चित्राची ज्यूरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. रु.5000/- शिल्ड व प्रमाणपत्र देऊन तिला गौरविण्यात येणार आहे. पूजा ही पी. टी. सी. संचलीत एम. एम कॉलेज 11वी कॉमर्स विभागाची विद्यार्थिनी आहे.
चित्राचा विषय ‘घोड्यांचे इतिहासातील स्थान ‘हा होता. याविषयासाठी पेपर कटिंग या प्रकारातून कलाकृती निर्माण केली. विविध रंगीत कागदांचा वापर या कलाकृती केलेला आपणांस दिसून येईल.त्यात तिची पेपर कटिंग ची मेहनत, सादर केलेले विषय, दर्जेदार मांडणी,आणि वेगळ्या धाटणीचे चित्र हेच या पुरस्कार मिळण्याचे गुपित
.पाचोऱ्यातील TVS शोरूम चे संचालक विजय पुंडलिक पाटील यांची ती कन्या आहे. तिला सुबोध कांतायन सरांचे मार्गदर्शन लाभले.
सोबतच अजून 12 विद्यार्थी –चैताली शिंदे, स्वामिनी जडे, दिक्षा चांदणे, सारिका पाटील, दिशा महाजन, वैष्णवी दातीर, प्रांजल पवार,सिद्धी सुतार, निशांत पाटील जयदीप पाटील, कुणाल बागुल, निशांत प्रभाकर पाटील यांची चित्र या स्पर्धेत पाठवली आणि त्याच्या चित्रांनाही त्या प्रदर्शनात प्रदर्शित होण्याचा मान मिळाला. त्या सुद्धा खूप सुंदर कलाकृती तयार झालेल्या आहेत.
पी टी सी संस्थेचे चेअरमन नानासो संजयजी वाघ, व्हा. चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी, प्राचार्य उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वर्ग यांनी पूजा व कांतायन सरांचे कौतुक व अभिनंदन केले.पाचोरा परिसरातून पूजा आणि सर्व विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.