तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत आंचळगाव व शिंदी विद्यालयास विजेतेपद

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत आंचळगाव व शिंदी विद्यालयास विजेतेपद…!!!!

भडगाव (वार्ताहर) – जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय तथा भडगाव तालुका क्रीडा समितीतर्फे आयोजित १७ वर्षाआतील शालेय कबड्डी स्पर्धेत आंचळगाव ता.भडगाव येथील कै.कृ.पा.माध्यमिक विद्यालयाचा संघ मुलांच्या गटात तर शिंदी ता.भडगाव येथील माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद प्राप्त केले,मुलांच्या संघास क्रीडाशिक्षक महेंद्र पाटील यांचे तर मुलींच्या संघास आर.पी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.मुलांमध्ये कोठली विद्यालय तर मुलींमध्ये गुढे विद्यालयाने उपविजेतेपद प्राप्त केले.

सदर स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रा.डॉ.दिनेश तांदळे व क्रीडा समन्वयक सचिन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली के.झेड.चव्हाण,एस.ए.वाघ,अरुण राजपूत,अमीत पाटील,प्रा.सतीष पाटील,प्रा.प्रेमचंद चौधरी,रविंद्र महाजन,गंभीर पाटील,एस.आर.पाटील,किशोर शंखपाळ,डी.एस.पाटील,महेंद्र पाटील आदि शिक्षकांनी परिश्रम घेतले.