पाचोरा हिवरा नदी – कृष्णापुरी पुलाचे सुरू असलेले बांधकाम संदर्भात- कच्चा पर्यायी मार्ग लवकरच काढुन देऊ- न.पालिका मुख्याधिकारी सौ.शोभा बाविस्कर मॅडम यांच अनिलभाऊ महाजन यांना दिले आश्वासन

पाचोरेकरां’साठी चांगली सुखद बातमी

पाचोरा हिवरा नदी – कृष्णापुरी पुलाचे सुरू असलेले बांधकाम संदर्भात- कच्चा पर्यायी मार्ग लवकरच काढुन देऊ- न.पालिका मुख्याधिकारी सौ.शोभा बाविस्कर मॅडम यांचे ए.एम फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ महाजन यांना दिले आश्वासन !!

पाचोरा प्रतिनिधी : पाचोरा हिवरा नदी कृष्णापुरी पुलाचे काम सुरू असल्याने पुर्वीचा जुना पुल तोडुन नवीन बांधकाम सुरू झालेले आहेत.हा पुल बांधण्यासाठी भरपुर वेळ लागणार असुन स्थानिक नागरीकांचे गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन व स्थानिक नागरीकांची महत्वाची मागणी पाहता यासाठी कच्चा पर्यायी रस्ता लवकरच काढावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ए.एम फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व गर्जा महाराष्ट्र न्युज समुहाचे चेअरमन श्री.अनिलभाऊ महाजन यांनी ई मेल’द्वारे/ लेखी निवेदनाद्वारे दिला होता.

त्या अनुषंगाने स्थानिक नागरीकांची गैरसोय होणार नाही त्यासाठी लवकरच कच्चा पर्यायी रस्ता नगरपालिका व ठेकेदार काढुनी देणार आहेत.

पर्यायी रस्त्याचे लवकरच काम सुरू करू असे न.पा.मुख्याधिकारी सौ.शोभा बाविस्कर यांनी आश्वासन दिले आहे.

*कुष्णापुरी हिवरा नदीवरील नवीन पुल बनणार आहेच पण तो पुल पुर्ण बनण्यासाठी* कालावधी लागणार आहे.पण आता लवकरच स्थानिक रहिवाशींना *पर्यायी कच्चा रस्ता मिळणार असुन याबाबत संबंधित ठेकेदार यांना ही सुचना पाचोरा न.पालीकेने दिली आहे.

पाचोरा कुष्णापुरी हिवरा नदीवरील पुलाची उंची वाढण्यासाठी सदर पूल पाडण्यात आला आहे व पुढील नवीन बांधकामासाठी हा पुल बंद करण्यात आले आहे. परंतु स्थानिक रहिवाशांची गावात जाण्या-येण्यासाठी दररोज गैरसोय होत आहे.जडणघडणीसाठी हा एकमेव गावात जाणारा व जोडणारा मुख्य शाॅर्टकट रस्ता आहे आणि आता दैनंदिन किरकोळ कामांसाठी भरपुर फिरून यावे लागत होते.

त्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने अनेक अडचणींना* स्थानिक लोकांना सामना करावा लागत आहे.यासंदर्भात गांभीर्य घेत ए.एम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गर्जा महाराष्ट्र न्युज समुहाचे चेअरमन अनिल भाऊ महाजन यांनी पाचोरा नगर पालिकेला दहा दिवसाचा अल्टिमेट दिला होता व पर्यायी रस्ता करण्याबाबत जिल्हाधिकारी, व पाचोरा प्रांताधिकारी, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचेकडे लेखी निवेदन ईमेलने ही दिले होते.आता याची दखल घेऊन नगरपालिका प्रशासन मुख्याधिकारी सौ.शोभा बाविस्कर मॅडम यांनी आश्वासन दिले की, येत्या दोन-तीन दिवसात हिवरा नदीवरील पुलाच्या बाजूला कच्चा पर्यायी रस्ता सुरू करण्याचे काम* सुरू करण्यात येईल.पावसाळ्याचे दिवस आहेत नदीला पाणी ही येत असते *याचीही काळजी घेण्यात येईल. त्या हिशोबाने नियोजन करून* लवकरच स्थानिक नागरिकांच्या समस्या दुर होतील असे आश्वासन अनिल महाजन यांना पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सौ.शोभा बाविस्कर मॅडम यांनी दिले आहे* व या बाबत *संबंधित ठेकेदार यांना ही तशा सुचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.