बलखंडी बाबाच्या यात्रेत गुंडगिरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, शांतता समितीच्या बैठकीत पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचा समाजकंटकांना इशारा
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील बलखंडी बाबाच्या यात्रेत जावून गुंडगिरी करणाऱ्यांची कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही असा सनसनित इशारा पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी माणिकदौडी येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिला.या बाबतची माहिती अशी की पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथील बलखंडी बाबाच्या यात्रेत गेल्या ३१ वर्षापुर्वी झालेल्या हिंदू -मुस्लीम समाजाच्या लोकातील वादापासुन या मंदिरातील पुजा अर्चा बंद पडलेली आहे.त्या पुर्वी हिंदू मुस्लीम समाजातील सर्व लोक एकत्र येऊन गुण्यागोविंदाने नांदत होते.यात्रा काळात हींदु मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊन दोन्ही समाजात वाद निर्माण झाले होते.हा वाद न्यायालयात गेला.त्या नंतर ही दरवर्षी होणाऱ्या यात्रेत हे वाद होतच राहीले आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतच राहीला. या वर्षीची बलखंडी बाबाची यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून हिंदू मुस्लीम दोन्ही समाजातील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक शांततेत पार पडली.या शांतता समितीच्या बैठकीत आम्ही पाथर्डी पोलिस स्टेशनचे प्रभारी म्हणून दोन्ही समाजातील मान्यवर मंडळी व सामाजिक कार्यकर्त्यांना आवाहन करतो की जर बलखंडी बाबाच्या यात्रेत कोणी गुंडगिरी केली तर कोणाचीही गय केली जाणार नाही त्यांच्या वर कडक कारवाई केली जाईल असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी केले.समाजात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी.यात्रा काळात कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत.समाज माध्यमांचा जपून वापर करावा.यात्रेत सर्व प्रकारचे धर्मभेद,जातीभेद, भाषाभेद,विसरून सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने सोबत राहुन दोन्ही समाजात आपली पत निर्माण झाली पाहिजे.गावाचा मान आणि लौकिक अबाधित राहीला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या शांतता समितीच्या बैठकीत पोलिसांची भूमिका दोन्ही समाजातील मान्यवर मंडळींना पटली असून बलखंडी बाबाच्या यात्रेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची ग्वाही दोन्ही समाजातील नेत्यांनी दिली आहे.तसेच या यात्रेत मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात येणार असून वाद करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई केली जाईल त्यामुळे या यात्रेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न करता यात्रा शांततेत पार पडावी असे आवाहन पाथर्डी पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.