दिंडेवाडी येथे बाबीरबाबा मंदिरासमोर संतोष महाराज पवार यांच्या काल्याच्या किर्तनाने त्रिदिनी अखंड हरिनाम सोहळा संपन्न
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथील शंकेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. मार्तंड महाराज तोगे आणि ह.भ.प.अर्जुन महाराज थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील दिंडेवाडी येथील थोरात वस्तीवरील बाबीरबाबा मंदिरासमोर दिनांक २ते४ऑगष्ट२०२५ या कालावधीत श्रावण मासानिमित्त त्रिदिनी अखंड हरिनाम आणि किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.दररोज पहाटे काकडा भजन, सकाळी शिवलिलाम्रुत ग्रंथ वाचन,दुपारी गाथा भजन,सायंकाळी प्रवचन आणि हरीपाठ,आणि रात्री हरी किर्तन या प्रमाणे कार्यक्रम संपन्न झाले.तिसगाव येथील दत्त मंदिराचे प्रमुख ह.भ.प. श्रीराम महाराज मचे,व तिंतरवणीच्या ह.भ.प.प्रियंकाताई रुपनर,यांची किर्तने झाली.दिनांक ४ऑगष्ट रोजी सकाळी गावातुन ग्रंथाची सवाद्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली होती.आणि नंतर शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथील ह.भ.प.संतोष महाराज पवार यांच्या काल्याच्या किर्तनात दहीहंडी फोडून या किर्तन सोहळ्याची सांगता झाली.गेल्या ९ वर्षांपासून श्रावण महिन्यात या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.बाबीरदेव भक्त केरुबाबा थोरात आणि ह.भ.प.सुर्यभान महाराज थोरात यांच्या संकल्पनेतून हा सोहळा गेल्या नउ वर्षांपासून दरवर्षी श्रावण महिन्यात साजरा करण्यात येतो.या सोहळ्यासाठी सावळेराम थोरात गुरुजी,महादु थोरात,गोंधळी थोरात, अप्पा थोरात,उमाजी थोरात,शिवाजी थोरात, दत्तू थोरात,पोपट थोरात,बालाजी थोरात, जालिंदर थोरात,भिमाजी थोरात, संभाजी वाघमोडे,पाराजी दिंडे,पोपट वाघमोडे,मंखळराव पांढरे,हनुमंत वाघमोडे मेजर,संजूभाउ दिंडे, आणि गायक ह.भ.प.ठकाजी महाराज दिंडे,ह.भ.प. भागवत महाराज मरकड,शिवाजी महाराज चन्ने,अंबादास दिंडे आणि चव्हाणवाडी,दिंडेवाडी येथिल तरुण मित्र मंडळ व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.दिंडेवाडी हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त मंदिरे असलेले अत्यंत छोटे गाव आहे.धार्मीकतेमुळे अध्यात्माची गोडी लागलेल्या या छोट्याशा गावात एकूण पन्नास मंदीरे आहेत.हे या गावाचे खास वैशिष्ट्ये आहे.शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी या बाबीर बाबा मंदिरासमोर सभामंडपाच्या कामाचा गेल्या मे महिन्यात शुभारंभ केल्याचा फलक तेथे झळकत आहे.परंतू हे काम नेमके कधी सुरू होणार या कडे सर्व भाविकांचे लक्ष लागले आहे.संबंधित कामाचा ठेकेदार खेडकर यांनी या सभामंडपाच्या कामाची लवकरात लवकर सुरुवात करावी अशी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे.