TAS चा विद्यार्थी अंडर-16 लायन्स क्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत ठरला सामनावीर
– पाच विकेट घेत अथर्व आर्य ने
संघाला मिळवून दिला विजय
प्रतिनिधी,
पुणे येथे लायन्स इंटरनॅशनल क्लबतर्फे आयोजित केलेल्या 16 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील अंतिम फेरीत पुण्यातील ‘द अकॅडमी स्कूलच्या’ (TAS) 16 वर्षीय विद्यार्थी अथर्व आर्य याने सामनावीराचा पुरस्कार पटकावला.
अथर्व ने चोंधे पाटील अकादमीकडून खेळताना त्याने 7 षटकात 13 धावा देत 5 बळी घेतले. त्याच्या या कामगिरी बद्दल सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने अंतिम फेरीत ७ षटका पैकी ३ षटक निर्धाव टाकले. ज्यामुळे संघाला आरामात सामना जिंकण्यास मदत झाली. हिंजवडी येथील 4 स्टार मैदानावर हा सामना फार पडला. यात अथर्व आर्यने गोलंदाजीवर बरोबरच फलंदाजीत देखील चांगली कामगिरी केली आहे.
TAS च्या सीईओ डॉ. मैथिली तांबे म्हणाल्या की, अथर्व आर्यची क्रिकेट मधील कामगिरी ही शाळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कसे जोपासते याचे उत्तम उदाहरण आहे. “दहावीमध्ये असलेला अथर्व आर्य हा केवळ एक क्रिकेट मध्येच नाही, तर शिक्षणात देखील हुशार आहे. आर्य भविष्यात असे अनेक टप्पे गाठेल. TAS मध्ये शिक्षणासोबतच तुमच्या आवडीच्या गोष्टींना आणि इतर कलागुणांना वाव दिला जातो. आमचा विश्वास आहे की, शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव दिला तरच विद्यार्थांचा विकास होईल.