नांद्रा येथील रस्त्याच्या विविध समस्या दिवाळीपूर्वी सोडविण्याचे लेखी आश्वासन

नांद्रा येथील रस्त्याच्या विविध समस्या दिवाळीपूर्वी सोडविण्याचे लेखी आश्वासन

नांद्रा ता.पाचोरा (वार्ताहार)- येथील रस्त्याच्या विविध समस्या बाबत दि.२७ व २८जूलै रोजी तिन महिन्यापूर्वी ग्राम पंचायत यांनी तहसिलदार कैलासजी चावडेसाहेब यांच्या दालनात झालेल्या चर्चा होऊन ही अशोका बिडकाॕन यांनी कोणतेच प्रश्न मार्गी न लावल्यामुळे पुन्हा ग्राम पंचायत कमिटी नांद्रा व ञस्त ग्रामस्थ यांनी पुन्हा स्मरणपञ देऊन समस्या निराकरण व्हाव्यात म्हणून दि.२१आॕक्टोंबर रोजी तिव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचे निवेदन संबंधित विभागांना दिले होते परंतु पोलिस विभागाच्या ,प्रांताधिकारी साहेब,तहसिलदारसाहेब,महामार्गाच्या अधिकारीवर्ग यांच्या समवायतून चर्चा करुन आपण यातून मार्ग काढण्याचा भूमिकेतून पाचोरा येथे प्रांताधिकारी कार्यलयात बैठक घेण्यात आली यामध्ये प्रांताधिकारी डाॕ.विक्रमजी बादलसाहेब,तहसिलदार कैलासजी चावडेसाहेब,डि.वाय.एस.पी.भारतजी काकडे साहेब,पोलिस निरीक्षक किसनजी पाटिलसाहेब, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी कल्याणी पाटिलमॕम,राहूल गांगुर्डे व गावातील ग्रा.प.कमिटी ,शांतता कमिटी शिष्टमंडळ व ग्रामस्थ यांच्यात रस्त्याच्या संदर्भात मागणी केलेल्या विविध समस्यावर प्रत्येक मुद्दद्यावर प्रांतसाहेब यांनी सविस्तर चर्चा घडवून आणून दिवाळी पूर्वी महत्त्वाचे विषयापैकी बसस्थानकावर पुरुष व स्ञी स्वतंत्र मुतारी बांधणे,रस्त्यावरचा फफूटा उडणार्य कच्च्या रस्त्याच्या ठिकाणी जेसीबी ने लेव्हल व स्लोब करुन जो पर्यंत डांबरीकरण होत नाही तो पर्यत खडी कच टाकून त्यावर दररौज पाणी मारणे,स्वामी विष्णुदासजी महाराज यांच्या आश्रम कडे जाणारा रस्ता व्यवस्थित नाली करुन स्लोब व भराव करुन पॕरेलल रस्ता नली करणे,प्राथमिक आरोग्य केंद्राचा तोडलेला अगोदरचा सिंमेट रस्ता दुरुस्त करुन देणे ,दलित वस्तीकडे जाणारे पूर्व कडिल शेतातील पाण्याचा सोर्स गावातील नालीची लेव्हल करुन देणे व शक्य असल्यास पाईप टाकणे, या सर्व विषयावर शक्य तितक्या लवकर म्हणजे दिवाळी पूर्वी पूर्ण करण्याची अमंलबजावणी करण्याच्या सूचना प्रांताधिकारी डाॕ.विक्रमजी बादल यांनी आलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या संबधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिल्यात याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा व ग्रामस्थांच्या सर्व समस्यांचे निराकरण पण शांतता मार्गाने व चर्चाच्या माध्यमातून सुटावेत म्हणून म्हणून डि.वाय.एस.पी.भारतजी काकडे,पोलिस निरीक्षक किसनजी पाटिल,तहसिलदार कैलासजी चावडेसाहेब,राष्ट्रीय महामार्गाच्या विभागीय अभियंता कल्याणजी पाटिल यांनी स्वतः नांद्रा स्पाॕटवर येऊन नांद्रा बसस्थानक पासून तर गावालगतच्या पुलापर्यत पाहणी करुन ग्रामस्थांनी मागणी केलेल्या सर्व समस्या प्रत्यक्ष पाहिल्या व त्यांचे दिवाळी पूर्व निराकरण करण्याचे लेखी आश्वासन प्रांतांधिकारी साहेब यांच्या कार्यलयात चर्चा करुन दिले याप्रसंगी ग्रा.प.कमिटी,शांतता कमिटी शिष्टमंडळ नांद्रा ,पोलिस पाटील,रस्त्यालगत ञस्त ग्रामस्थ उपस्थित होते.