पुण्यातील मोक्का गुन्ह्यातील फरारी आरोपी अक्षय मरकड आणि विकी भोसले यांच्या पाथर्डी पोलिसांनी मुसक्या आवळल्या
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) पुणे जिल्ह्यातील सांगवी पोलिस स्टेशनमध्ये मोक्का गुन्ह्यातील फरारी आरोपी अक्षय मरकड आणि विकी भोसले यांच्या पाथर्डी पोलिसांनी मुसक्या आवळून गजाआड केले आहे.या बाबतची घटना अशी की दिनांक २४ जुलै२०२५ रोजी रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास अक्षय राजेंद्र जायभाय राहणार, शिक्षक कॉलनी, पाथर्डी,आणि शिवम भारत आठरे राहणार पारेवाडी,तालुका पाथर्डी हे तिसगाव हुन पाथर्डी कडे दुचाकीवरून जात असताना निवडुंगे शिवारात विकी पोपट भोसले,राहणार, कासारवाडी,तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर,अक्षय दत्तात्रय मरकड, राहणार निवडुंगे, तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर,लखन बाबासाहेब कासार, राहणार,कासारवाडी, तालुका पाथर्डी,जिल्हा अहिल्यानगर आणि एक अनोळखी इसम असे चौघे जण हे पाठीमागून विना नंबरच्या स्वीफ्ट कारमध्ये आले.आणि दुचाकीला पाठीमागिल बाजूने जोरदार धडक देऊन खाली पाडले आणि अक्षय जायभाय व शिवम आठरे यांना लोखंडी रॉड ने जोरदार मारहाण करून जखमी केले.तसेच जायभाय याच्या खिशातील रोख रक्कम ७५०० रुपये,व गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन बळजबरीने चोरून घेऊन जायभाय व आठरे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन निघुन गेले.या आशयाची फिर्याद अक्षय राजेंद्र जायभाय राहणार,शिक्षक कॉलनी,पाथर्डी यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ८१०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४),३०९(६),३(५),१६१,८४१ प्रमाणे दाखल केली होती.या गुन्ह्यातील पहिला संशयित आरोपी विकी पोपट भोसले हा गुरुवार दिनांक ३१ जुलै रोजी त्याच्या कासारवाडी तालुका पाथर्डी येथील राहत्या घरातून पळून जात असताना पोलीसांनी दोन किलो मीटर अंतरावर पाठलाग करून रंगेहाथ पकडला.दुसरा आरोपी अक्षय दत्तात्रय मरकड राहणार निवडुंगे, तालुका पाथर्डी,हा शनिवार दिनांक २ऑगष्ट २०२५रोजी हनुमान टाकळी तालुका पाथर्डी शिवारात असल्याची माहिती पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली होती.त्यांनी लगेचच पोलिस उपनिरीक्षक संदिप ढाकणे,व पोलिस कॉन्स्टेबल कानिफनाथ गोफणे, यांच्या पथकाची नियुक्ती केली.नियोजित पथकाने आरोपीचा शोध घेतला असता तो पोलीसांना पाहून पळून जाउ लागल्याने पोलिस पथकाने त्याचा पाठलाग करत हनुमान टाकळी येथील उसाच्या शेतात त्यास रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.त्याच्याकडे वरील गुन्ह्याच्या संदर्भात विचार पुस केली असता त्यानें पोलीसांना वरील साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.अक्षय दत्तात्रय मरकड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये मागिल चार गुन्हे पुढीलप्रमाणे नोंद करण्यात आलेले आहेत.१) गुन्हा रजिस्टर नंबर ३९/२०२२,भादवी कलम ३२३,३२४,५०४,५०६, ३४.२) गुन्हा रजिस्टर नंबर ३०८/२०२३,भादवी कलम ३०७,३२६,४३८,१०९. ३) गुन्हा रजिस्टर नंबर १०९७/२०२४ भादवी कलम ११८(१),११९(१),१२६(२),१९०,१९१. ४) गुन्हा रजिस्टर नंबर २७९/२०२४ भादवी कलम ३४१,३६५,३८३,आर्म ॲक्ट ३(२५),१२० ब.५) पुणे जिल्ह्यातील सांगवी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ४९१/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम १४०(२),१२७(२),३१ (२),३(५),सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अधिनियम सन २०९९चे कलम ३(१)ii,३(२),३(४), प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.पोलीस स्टेशनला न दाखल झालेले अनेक संघटीत गुन्हे या टोळीने केलेले आहेत.परंतू गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेले पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या सर्व प्रकारच्या गुन्ह्याचा छडा लावण्याचा चंगच बांधला आहे. सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलबुर्मे साहेब, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या सुचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक संदिप ढाकणे,पोलिस कॉन्स्टेबल कानिफनाथ गोफणे यांच्या पथकाने केली आहे.विकी भोसले याच्या मुसक्या आवळण्या साठी पोलिस हेड कॉन्स्टेबल अभयसींह लबडे आणि पोलिस कॉन्स्टेबल अक्षयकुमार वडते यांनी कासारवाडी येथे आरोपीचा पाठलाग करत ही कामगिरी केली होती.