हेमाडपंथी शिव मंदिर प्रकरणानंतर पोलिसांची सज्जता
आन्वा गावात शांतता बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा : पो.नि. किरण बिडवे
आन्वा (ता. भोकरदन) –
हेमाडपंथी शिव मंदिरात मासाचे अंश आढळल्याच्या घटनेनंतर गावातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पारध पोलीस ठाण्याचे प्रभारी तथा भोकरदन पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी दिला आहे.
ग्रामस्थांना आवाहन करताना बिडवे म्हणाले,
“काल घडलेली घटना निंदनीय आहे. शांतता भंग करणाऱ्यांवर कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाईल. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.”
—
🤝 शांतता बैठकीत सामाजिक सलोख्याचे आवाहन
या पार्श्वभूमीवर पारध पोलिसांच्या पुढाकाराने आयोजित शांतता बैठकीत सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
बैठकीस सरपंच शोभाताई सोनवणे यांचे पती पुंजाजी सोनवणे, केशवराव काळे, अमरजीत देशमुख, मसूद अण्णा बागवान, नितीन देशमुख, मदनसेठ कुलवाल, पारध पोलीस कर्मचारी गणेश निकम, बिट जमादार खिल्लारे, संदीप पाटील, विकास जाधव, प्रकाश शिनकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—
⚖️ गुन्हा दाखल व बंदी आदेश
अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल : एपीआय वाल्मिक नेमाने
गावात उघड्यावर मांस व मासे विक्रीस पूर्ण बंदी
नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
उत्स्फूर्त बंद
घटनेच्या निषेधार्थ आज (शनिवार) आन्वा गावातील व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला.