पाथर्डी पोलिस स्टेशनच्या आवारातील बेवारस अवस्थेतील वाहने वाहन मालकांनी आठ दिवसांत घेऊन जावीत,अंन्यथा कडक कारवाई अटळ : पोलिस निरीक्षक मुटकुळे

पाथर्डी पोलिस स्टेशनच्या आवारातील बेवारस अवस्थेतील वाहने वाहन मालकांनी आठ दिवसांत घेऊन जावीत,अंन्यथा कडक कारवाई अटळ : पोलिस निरीक्षक मुटकुळे

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अ.नगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलिस स्टेशन तर्फे जाहीर आवाहन करण्यात येते की पाथर्डी पोलिस स्टेशनच्या आवारातील गेटसमोर अनेक दुचाकी, तिनचाकी,चारचाकी वाहने बेवारस स्थितीत उभी करण्यात आलेली आहेत.काही वाहने ही अपघातातील जखमींना जखमी केलेल्या पैकी आहेत.तर काही वाहने ही वाळू, मातीची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली आहेत. तसेच काही वाहनांची कागदपत्रे उपलब्ध नसल्याने व वेगवेगळ्या अन्य कारणांमुळे पकडण्यात आलेली आहेत.अनेक दिवसांपासून उभी राहिलेली तुटफुट झालेली अनेक वाहने ही गंजलेल्या अवस्थेत उभी आहेत. तरी ही बातमी प्रसिद्ध झाल्यापासून आठ दिवसांच्या आत सदर वाहन मालकांनी सदर वाहनांची योग्य ती कागदपत्रे दाखवून आपली वाहने घेऊन जावीत, वाहनमालक जर आठ दिवसांत सदरची वाहने घेऊन गेले नाहीत तर सदर वाहनांच्या विरोधात सरकारी नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील वाहन मालकांनी याची नोंद घ्यावी असे पाथर्डी पोलीस स्टेशनतर्फे कळविण्यात आले आहे. ज्या वाहन मालकांची वाहने उभी आहेत त्यांनी तातडीने तात्काळ पाथर्डी पोलिस स्टेशनच्या (02428/222333) या नंबरवर किंवा पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस काॅंन्स्टेबल यांच्याशी या 9767942552 नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांनी केले आहे.