अमोल भाऊंचे अनमोल नेतृत्व कार्यकर्त्यांचे बहुमोल कर्तृत्व

अमोल भाऊंचे अनमोल नेतृत्व कार्यकर्त्यांचे बहुमोल कर्तृत्व

पाचोरा – तारीख 19 नोव्हेंबर
येथील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांचा वाढदिवस (संपुर्ण पंधरवडा ) अत्यंत साधेपणाने मात्र प्रचंड उत्साहात साजरा झाला. पाचोरा तालुक्यातील राजकीय क्षितिजावर उगवलेल्या या युवनेत्याची लोकप्रियता दिवसागणिक वाढत असल्याचे स्पष्ट संकेत या वाढदिवसातून मिळाले.

अत्यंत सुसंस्कारित, निष्कपट, निष्कलंक, निर्व्यसनी, युवा नेतृत्व म्हणून अमोल भाऊ शिंदे यांची उज्वल प्रतिमा आहे. समाजातील सर्वच लहान-थोर घटकांमध्ये, त्यांचा चाहता वर्ग वाढला आहे. माता-भगिनी तसेच अबालवृद्ध जनतेसोबतच तरुणांमध्ये अमोल भाऊ शिंदे यांची एक आदर्श प्रतिमा निर्माण झालेली आहे. निसटता पराभव पत्करून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा एकदा उंच भरारी घेणाऱ्या अमोल भाऊंच्या संयमशील व स्थितप्रज्ञ नेतृत्वावर असंख्य कार्यकर्त्यांचा विश्वास शतगुणित भक्कम झाला आहे.

अमोल भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सामाजिक कार्याची प्रेरणा घेणाऱ्या एका युवकाने अमोल भाऊंच्या वाढदिवसानिमित्त स्मशानभूमी ची स्वच्छता करून एक विधायक विकास कामाची पावती अमोल भाऊ च्या वाढदिवसानिमित्त दिली आहे.

सातगाव डोंगरी येथील अक्षय भगवान मंदाडे उर्फ बंटी आणि त्याचे मित्र अंकुश गवळी, मयुर मंदाडे, दीपक काळे, गोकुळ वाघ व मित्र परिवाराने अमोल भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील स्मशानभूमीतची संपूर्ण स्वच्छता करून एक विधायक कामाची अनोखी भेट अमोल शिंदे यांना दिली. मराठवाड्यातील तिडका येथील युवा नेतृत्व दिनेश जाधव यांनी कोणताही मोबदला न घेता अमोल भाऊंच्या वाढदिवसा निमित्त स्वतःचे जेसीबी मशीन या विधायक कार्यासाठी मोफत उपलब्ध करून दिले होते.

आपल्या आदर्श नेत्याला त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कृत्य किंवा सत्कर्माची भेट देणाऱ्या या महान कार्यकर्त्यांची मतदारसंघात चर्चा आहे.

अमोल भाऊंच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन यापूर्वी दिवाळीच्या निमित्ताने यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर अक्षय भगवान मंदाडे आणि त्याचे मित्र मयूर मंदाडे, नरेंद्र अर्जुन पाटील, दत्तू मोकळे यांनी गरीब, गरजू परिवाराला स्वखर्चाने 100 शालीन चे वाटप करून ग्रामीण भागात सामाजिक व संवेदनशील कार्यकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण केली होती.

अमोल भाऊंच्या वाढदिवसा निमित्त स्पर्धक विरोधकांचे कार्यकर्ते ज्यावेळेस “काडी करण्याला शूरत्व समजत होते, त्यावेळेस अमोल भाऊंचे विधायक कार्यकर्ते स्मशानभूमीतील काडीकचरा गोळा करून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण करीत होते.”

अमोल भाऊ यांच्या नेतृत्व शैलीची आणि कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीची एक वेगळी ओळख मतदारसंघात बघायला मिळते.

जसा नेता व जसे नेत्याचे संस्कार तसेच कार्यकर्त्याचे व्यवहार ….! घरातील ज्येष्ठ व्यक्तींची अनुकरण तरुण किंवा बालके करतात , तसेच नेत्याचे अनुकरण सुद्धा त्याचे कार्यकर्ते करत असतात, असे आपण नेहमीच म्हणतो. अमोल भाऊ यांच्या नेतृत्वात घडणाऱ्या महान कार्यकर्त्यांचे वेगवेगळे पैलू आपल्याला बघावयास मिळतील. सुसंस्काराचा ठेवा आणि आदर्श समाजसेवेचे बाळकडू राजकारणाच्या युवा अवस्थेत देण्याचे काम अमोल भाऊ शिंदे कार्यकर्त्यांना करीत आहेत. अमोल भाऊ शिंदे यांचा भविष्यकाळ अत्यंत उज्ज्वल आहे. कारण विधायक कार्याचे गोडवे गाण्यायोग्य संस्कारशील कार्यकर्त्यांची भक्कम फळी मतदार संघात आहे.