मा.आ.आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन

मा.आ.आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन

पाचोरा (प्रतिनिधी)ता.17
बांबरुड (राणीचे) ता.पाचोरा
खान्देशचा ढाण्या वाघ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेले पाचोरा तालुक्याचे सहकार,शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी माजी आमदार स्व.आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ आज रोजी पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. शक्तीस्थळाला माजी आमदार दिलीप भाऊ वाघ ,पी.टी.सी. चेअरमन संजय नाना वाघ,कृ.उ.बा.माजी सभापती दगाजी वाघ व मधुकर वाघ यांनी पुष्प.अर्पण करून अभिवादन केले. सहकार आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी
समाजकारण ,सहकार, शिक्षण केंद्रबिंदू मानून पाचोरा मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरू केले. मतदारसंघात विविध प्रकल्प आणून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेकविध आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द घडवित आहेत. खलील देशमुख यांनी स्व.ओंकार वाघ यांच्या आठवणीना उजेळा दिला यावेळी पी.टी.सी. व्हा. चेअरमन व्ही.टी. जोशी, पं .स .गटनेते ललित वाघ, नगरसेवक भुषण वाघ,नितीन तावडे ,खलील देशमुख ,विनायक जकातदार ,श्याम भोसले ,नाना देवरे ,प्रकाश पाटील ,सुनिल पाटील ,जगदीश सोनार ,मधुकर पाटील ,प्राचार्य डॉ.शिरीष पाटील, प्राचार्य विश्वासराव साळुंखे, प्रा भागवत महालपुरे, वासुदेव महाजन,अशोक मोरे, आकाश वाघ,विजय पाटील,सरपंच बुऱ्हान तडवी,उपसरपंच प्रदीप वाघ ,शशिकांत वाघ ,मुख्याध्यापिका प्रमिला वाघ,प्रकाश भोसले ,रणजित पाटील ,अजय अहिरे, ,पितांबर कोतवाल,प्रेमराज शेवगे,सुभाष शिंदे,अली पेंटर,गुलाब तडवी,अली मेवाती, जगदीश वाघ,पिंटू दारकोंडे ,भाऊसाहेब पाटील ,सदाशिव नरवाडे नामदेव पाटील,, सुभाष शिंदे, सुभाष शिर्के, राजेंद्र सोनार, रवींद्र पाटील, राजु गावंडे ,गोदाराम बडगुजर, भगवान डांबरे, मुख्याध्यापक सुधीर पाटील,प्राचार्य डी. व्ही. पाटील, पर्यवेक्षक जी. एन. पाटील तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
बांबरुड( राणीचे)येथील मा.आ.आप्पासाहेब ओंकार वाघ यांच्या शक्तीस्थळास अभिवादन करताना माजी आमदार दिलीप भाऊ वाघ,संजय नाना वाघ व मान्यवर