वंचित बहुजन आघाडी जळगाव पश्चिम – भव्य जिल्हा आढावा बैठक संपन्न
वंचित बहुजन आघाडी जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पंडित पाटील (लाला सर) यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष कार्यालय, गोलाणी मार्केट, जळगाव येथे जिल्हा कार्यकारिणी तसेच सर्व तालुका अध्यक्षांची भव्य आणि उत्साहपूर्ण आढावा बैठक पार पडली.
बैठकीदरम्यान पक्ष संघटनाची सध्याची स्थिती, आगामी पक्षविस्तार मोहिम, सदस्य नोंदणी अभियान, तसेच आठही तालुक्यांतील संघटन बळकटीकरण या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील अहवाल सादर करत जनतेच्या प्रश्नांसाठी आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा परिषद गट आणि गण पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच कुठल्याही युतीचा निर्णय पक्षाच्या धोरणानुसार आणि स्थानिक स्तरावरील परिस्थितीचा सखोल अभ्यास करून घ्यावा, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस पुढील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते :
1️⃣ ईश्वर पंडित पाटील – अध्यक्ष
2️⃣ आॅ. रविंद्र भास्कर ब्राह्मणे – महासचिव
3️⃣ अमित मानखा तडवी – महासचिव
4️⃣ प्रविण जगन सपकाळे – कोषाध्यक्ष
5️⃣ गमीर शेख बाबू – संयोजक
6️⃣ अनिल पुंडलिक लोंढे – उपाध्यक्ष
7️⃣ हरिश्चंद्र शंकर सोनवणे – उपाध्यक्ष
8️⃣ मधुकर सुगदेव तांदळे – उपाध्यक्ष
9️⃣ विनोद बाबुराव बेरभेळ्या – उपाध्यक्ष
🔟 प्रितीलाल निंबा पवार – सचिव
तसेच बैठकीस महानगर अध्यक्ष ललित भाऊ घोगले, युवक जिल्हाध्यक्ष जितु भाऊ केदार, पाचोरा तालुक्याचे माजी अध्यक्ष विशाल बागुल, चाळीसगाव तालुक्याचे माजी अध्यक्ष विलास चव्हाण, चाळीसगाव शहराचे माजी शहरप्रमुख सागर निकम, अमळनेर तालुक्याचे माजी अध्यक्ष दाजीबा गव्हाणे, धरणगाव तालुक्याचे शिंदे ,तसेच अनेक कार्यकर्ते, पदाधिका युवाकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत पक्षाच्या भावी रणनीती, सामाजिक जनजागृती अभियान, गावोगाव पक्षप्रवेश मेळावे आणि नव्या कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत देखील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीच्या समारोप प्रसंगी जिल्हाध्यक्ष ईश्वर पंडित पाटील (लाला सर) यांनी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सांगितले की,
“आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, समाजातील वंचित-बहुजन घटकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अधिक जोमाने काम करावे. निवडणुकांना समोर जाताना सर्व जिल्हा परिषद गट आणि गन पूर्ण ताकतीने
लढू तसेच कुणाशी युती करायची यासोबत पण सविस्तर चर्चा करण्यात आली” 25 तारखेनंतर प्रत्येक तालुक्यात सेपरेट आढावा बैठक कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे