रात्री बैलगाडीने ऊस वाहतूक केल्यास अधिनियम १९६० अंतर्गत कारवाई अटळ : साखर आयुक्त डॉ संजय कोलते साहेब यांचे साखर कारखान्यांना आदेश
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा ) संपूर्ण महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांनी आणि ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी चालकांनी रात्री बैलगाडीने ऊसाची वाहतूक केल्यास अधिनियम १९६० अंतर्गत कारवाई अटळ आहे असे आदेशच साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी साखर कारखान्यांना दिले आहेत.कारण बैलांना अत्यंत क्रुरतेची वागणूक बैलगाडी चालकांकडून दिली जाते.केंद्र सरकारने प्राण्यांना अत्यंत क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्यासाठी “द ट्रान्सपोर्ट ऑफ ॲनिमल्स ऑन फुट रुल्स २००१, आणि द प्रिव्हेंशन ऑफ क्रुल्टी टू ड्राॅट ॲन्ड पॅक ॲनिमल्स रुल्स १९६५ “अंतर्गत काही बाबी अधिसुचित करण्यात आलेल्या आहेत.त्या पुढील प्रमाणे जनावरांना दिवसभरातून ९ तासाहुन अधिक काळ उस वाहतूक करून देऊ नये.तापमान ३७ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असल्यास अशा ठिकाणी दुपारी १२ ते ३ या वेळेत जनावरांना विश्रांती घेणे आवश्यक आहे.जनावरे (बैलांना) प्रत्येक दिवशी ३० किलो मिटर किंवा ८ तास आणि खाण्या पिण्यासाठी ४ किलोमीटर प्रति २ तास या पलीकडे प्राण्यांची पायी ने आण करता येणार नाही.प्राण्यांना विनाकारण यातना आणि वेदना होतील अशा बाबी विषयीच्या अपराधा बाबद दंडाची आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे.कुपोशित , आजारी,जखमी, आणि जास्त वय असलेल्या बैलांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी त्यांना सक्तीची विश्रांती देणे आवश्यक आहे.या साठी स्थानिक पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आणि सहकार्याने साखर कारखाना परिसरात एक पशु वैद्यकीय अधिकारी आणि एक पशु सहायक यांची नेमणूक करण्यात यावी.आणि त्यांची सेवा तातडीने उपलब्ध करून घेण्यात यावी. महाराष्ट्रातील कोणत्याही साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करताना बैलांना अत्यंत क्रुरतेची वागणूक देण्यात येवू नये याकडे साखर कारखाना प्रशासनाने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.बैलांवर क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात वजन लादू नये. सुर्योदया पुर्वी आणि सुर्यास्ता नंतर बैल गाड्यांची ने आण करू नये.सुर्योदया पुर्वी आणि सुर्यास्ता नंतर कारखान्याचे बैलगाड्या करीता वजन मोजण्यासाठी असलेले काटे बंद करून ठेवण्यात यावे. असे आदेश साखर आयुक्त डॉ संजय कोलते साहेब यांनी महाराष्ट्रातील सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखान्याच्या प्रशासनाला दिले आहेत.या मध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा केल्यास कारवाई ला सामोरे जाण्याची तयारी ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी चालकांनी ठेवावी अशा कडक शब्दात साखर आयुक्तांनी साखर कारखाना प्रशासनाला दिले आहेत. काही साखर कारखाने ज्या बैलगाडी वाहनांनी जास्त प्रमाणात ऊसाची वाहतूक केली त्यांना बक्षिसे देतात परंतु त्यांना बक्षिसे देताना गाडीवानाने वरील नियमांचे काटेकोरपणे पालन केले आहे की नाही हे तपासून पाहणे अत्यंत आवश्यक आहे.नाहीतर कारखान्याच्या बक्षिसा साठी बैलावर जास्त बोजा लादून बैलांचा जीव जाईल आणि बक्षिसे दिली जातील याचीही खबरदारी कारखान्या तर्फे घेण्यात यावी.बक्षिसांच्या हव्यासापोटी प्राण्यांचा जीव जाणार नाही याची दक्षता साखर कारखान्याच्या प्रशासनाने घ्यावी अशाही सूचना साखर आयुक्तांनी साखर कारखाना प्रशासनाला दिलेल्या आहेत.