दिपावलीच्या पूर्वसंध्येला श्री पराशर ऋषी महाराज मंदिर,पारध परिसरात भव्य दिपोत्सव

दिपावलीच्या पूर्वसंध्येला श्री पराशर ऋषी महाराज मंदिर,पारध परिसरात भव्य दिपोत्सव

 

 

पारध ( श्री महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी): जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या पारध शाहूराजे या गावात सालाबादाप्रमाणे यंदाही दिपावलीच्या पूर्वसंध्येला श्री पराशर ऋषी महाराज मंदिर परिसरात दिमाखदार दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सलग चौथ्या वर्षी पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात तब्बल अकरा हजार दिप प्रज्वलन करून संपूर्ण मंदिर परिसर प्रकाशमय करण्यात आला.

या पवित्र कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन देवेंद्र चैतन्य स्वामी, देशसेवेतील सैनिक नारायण राऊत, नेव्हीमध्ये कार्यरत वर्षा सतिश लोखंडे, तसेच संजय बेराड, अमोल काटोले, चेतन लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. दिपोत्सवाचा हा अतुलनीय क्षण अनुभवण्यासाठी भाविक भक्त, माता-भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आध्यात्मिक कार्यासाठी पवन आनंदा जाधव,सचिन बोराडे, नारायण राऊत, आकाश लोखंडे, गणेश लोखंडे, संतोष पाखरे, सुरेश देशमुख महाराज, संजय नारायण लोखंडे, किशोर तबडे सर, ज्ञानेश्वर आल्हाट सर, पत्रकार श्री महेंद्र बेराड सर,गजानन ठेंग, मनोज जोशी,विनोद लोखंडे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाल स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.

रांगोळी सजावटीत शितल रमेश लोखंडे, रोहीणी लोखंडे, अंकीता लोखंडे, वैष्णवी जाधव, दिपाली लोखंडे व आस्था लोखंडे यांनी कल्पकतेने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भाविकांनी दिपप्रज्वलनाचा दिव्य आणि अविस्मरणीय क्षण अनुभवत “दीपावलीचा संदेश – अंध:कारातून प्रकाशाकडे” या भावनेने उज्ज्वलतेचा संकल्प केला.