जिनियस मास्टर्स फाउंडेशन,जामनेर तर्फे आदर्श शिक्षकरत्न सन्मान पुरस्कार 2023

जिनियस मास्टर्स फाउंडेशन,जामनेर तर्फे आदर्श शिक्षकरत्न सन्मान पुरस्कार 2023

जिनियस मास्टर्स फाउंडेशन,जामनेर तर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षकरत्न सन्मान पुरस्कार अरिहंत नगर येथील रहिवासी श्री.दिपक शालिग्राम गोसावी सर व पवन नगर येथील श्री.मनोज भिकन दुसाने सरांना मिळाल्याबद्दल त्यांचा आपल्या तालुक्याचे आमदार मा.किशोर आप्पा पाटील व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मा.रावसाहेब पाटील,मा.अविनाश कुडे,शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मा.राजेंद्र पाटील सर,मा.अनिल पाटील सर,मा.सुरेश पाटील सर व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन शिवसेनेचे मा.गजू पाटील यांनी केले.