निर्मल इंटरनॅशनल स्कूलची इशिता निळे हिची उंच झेप घेत विभागीय स्पर्धेकडे वाटचाल…!
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विद्यमाने, तसेच जिल्हा क्रीडा परिषद जळगाव आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तर शालेय उंच उडी स्पर्धा पाचोरा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात निर्मल इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कु. इशिता रवींद्र निळे हिने १४ वर्षे वयोगटात आपल्या उत्कृष्ट कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर चमकदार कामगिरी सादर केली आहे.
आपल्या झेपेच्या बळावर इशिताने स्पर्धेतील प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक अभिमानास्पद पान जोडले गेले आहे.
या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा मा. वैशालीताई सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी श्री. आय. बी. सिंग, उपप्राचार्य श्री. प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील व प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील यांनी इशिताचे मनःपूर्वक अभिनंदन करून विभागीय स्पर्धेतही उत्तुंग यशासाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामागे क्रीडा शिक्षक श्री. गणेश मोरे, श्री. नंदू पाटील, श्री. प्रवीण मोरे आणि श्री. सोमनाथ माळी यांच्या अथक प्रयत्न, तांत्रिक मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रेरणेचा मोलाचा वाटा आहे.
निर्मल इंटरनॅशनल स्कूलने नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन दिले असून, इशिताचे यश हे शाळेच्या क्रीडा संस्कारांचे जिवंत उदाहरण ठरले आहे.