चाळीसगाव बस डेपोच्या महिला कंडक्टर “पुनम वैभव सूर्यवंशी” यांच्या सतर्क मुळे महिलाची पोत वाचली
जळगाव दिनांक 15- 10 – 2025 दुपारी 2:30 मिनिटांनी जळगाव बस स्टॉप जळगाव चाळीसगाव बस वर गाडीत चढताना गर्दीत सौ मनीषाताई जाखेटे जळगाव यांच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरण्याचा प्रयत्न एका 50 वर्ष महिलेने केला परंतु कंडक्टर मॅडम सौ पुनम वैभव सूर्यवंशी चाळीसगाव डेपो यांच्या लक्षात आले त्यांनी लगेच आरडाओरड करून त्या महिलेस सावधान केले सुदैवाने सोन्याची पोत वाचली, (अंदाजे किंमत 3ते4 लाख ) चोरी करणारी महिला मात्र पळून जाण्यात यशस्वी झाली.
चाळीसगाव महिला कंडक्टर सौ पुनम वैभव सूर्यवंशी यांचे प्रवाशांनी तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत जळगाव जिल्हा आयटीसी सेल प्रमुख शरद गीते , सौ मनीषाताई जाखेटे ,मयूर सुधाकर महाजन मा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अनिल देशमुख , यांनी फुलगुच्छ देऊन त्यांचे कौतुक केले, व आभार मानले