होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात मोदी सरकारचा खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश

होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात मोदी सरकारचा खोट्या आश्वासनांचा पर्दाफाश

पाचोरा तालुक्यात ‘हो उद्या चर्चा’ कार्यक्रमाचा शुभारंभ
पाचोरा: शिवसेना पक्षप्रमुख तथा मा. लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर सुरू असलेल्या *होऊ द्या चर्चा* अभियानांतर्गत पाचोरा तालुक्यातील भोजे व पिंपळगाव हरेश्वर येथे मा. श्री. विठ्ठल धुमाळ पाटील, जिल्हाप्रमुख जळगाव मा, श्री डॉ.हर्षल माने, जिल्हाप्रमुख रावेर श्री दीपक सिंग राजपूत, शिवसेना नेत्या सौ, वैशालीताई सुर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख श्री उद्धव मराठे, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, युवासेना जिल्हा उपप्रमुख संदीप जैन, व युवा सेना तालुकाप्रमुख शशिकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित दि. 01/10/2023 रोजी सायंकाळी 5:00 ते 9:00 दरम्यान होऊ द्या चर्चा कार्यक्रम संपन्न झाला. होऊ द्या चर्चा कार्यक्रमावेळी सौ. वैशालीताई सुर्यवंशी या म्हणाल्या की, सन 2014 मध्ये झालेल्या लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जी आश्वासने नवनिर्माण भारताचे स्वप्न उभे केले होते ते आज दहा वर्षाच्या काळात जनतेचा भ्रम निराश झाला. मतदार राजांची घोर फसवणूक झाली, काळे धन भारतात आले नाही, पंधरा लाख रुपये नागरिकांच्या खात्यात जमा केले गेले नाही, रोजगार उपलब्ध केला नाही, प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली, सुशिक्षित तरुणांच्या जीवनात नैैराश्य निर्माण झाले, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवले, कर्ज वसुली सक्तीची आहे म्हणून आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, उत्पन्नाला हमीभाव नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला दुधाला भाव नाही, शेतकऱ्यांचे पांढरे सोने कापूस पिकाला भाव नाही, खरेदी केंद्र बंद पडलेले, आजही कापूस शेतकऱ्यांच्या घरात पळून आहे, महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला पोहोचले, गरिबांची चूल कशी पेटवावी हा प्रश्न उभा राहिला आहे, आरोग्याच्या सुविधा कोळमळल्या, इमारती उभ्या केल्यात, डॉक्टर्स, नर्स इतर स्टाफ भरती नाही, साथीच्या लसीकरणाचे औषधे उपलब्ध नाहीत, सर्पदंश, श्वान दंश यावरील औषधे सरकारी रुग्णालयात नाही सरकारी दवाखान्यांचे फक्त इमारतीचे टोलेजंग जंगले उभे केले, नवीन धोरणे नव्या योजना फसव्या असून अंबलबजावणी शून्य आहे, महिला अत्याचार, बलात्कार, विनयभंग प्रमाण वाढले असून गुन्हेगारांवर कठोर कार्यवाही नाही हे श्रीरामाचे नाव घेऊन राज्य करण्याचं दुर्दैव आहे भाजपा सरकारचं. महाराष्ट्रात महा आघाडीचे शासन होते मा. श्री शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते माननीय उद्धवजी ने घेतलेले निर्णय तमाम जनतेच्या हिताचे होते. महाराष्ट्रातील बळीराजाला भक्कम आधार देण्यासाठी कर्जमुक्त करण्यासाठी आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी बिना अटी शर्तीची सरसकट कर्जमाफी देऊन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. कापूस व इतर पिकांना हमीभाव दिले. कोरोना हे जागतिक महामारी असताना कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका निभावून लाखो नागरिकांचे प्राण वाचवले. औषधोपचार ऑक्सिजन पुरवून उपलब्ध करून सुनियोजित बंदाचे नियोजन करून कोरोना महामारी सोबत यशस्वी लढा दिला व जगातील आदर्श मुख्यमंत्री ठरले तरी देखील भाजपाने कटकारस्थान करून सत्तांतर घडवले. हे महापाप केले येणाऱ्या 2024 मध्ये या पापाचा बदला घ्यावा लागेल भाजपापासून देशाला वाचवावे लागेल भाजपा मुक्त देश उभा करण्याची प्रतिज्ञा घेऊया असं ताईसो यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री उद्धव मराठे यांनी केले, सूत्र संचालन राजेंद्र राणा यांनी केले. यावेळी विनोद बाविस्कर, अनिल सावंत, पप्पू राजपूत, मिथुन वाघ, चंद्रकांत पाटील, अरुण तांबे, प्रितेश जैन, राजा बाबू, देविदास पाटील, अण्णा परदेशी, भगवान पाटील, अजय तेली, प्रशांत पाटील, कैलास परदेशी, गोकुल परदेशी, गजानन पोतदार, जगदीश परदेशी, सतीश मराठे, अमोल राठोड, लकीचंद पवार, सुभाष पाटील, विरेंद्र सिंग देशमुख, भूषण नैनाव, भारत परदेशी, ईश्वर पाटील, विलास राजपूत, विश्वनाथ तेली, राजेंद्र देशमुख, अतुल सूर्यवंशी, राहुल चौधरी, राहुल पाटील सह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व ज्येष्ठ व श्रेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.