पाचोर्‍यातील मोबाईल दुकान फोडणारा चोरटा २४ तासात पोलिसांच्या ताब्यात!

पाचोर्‍यातील मोबाईल दुकान फोडणारा चोरटा २४ तासात पोलिसांच्या ताब्यात!

पाचोरा शहरांमध्ये आज दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले अथर्व मोबाईल शॉपी रेल्वे स्टेशन रोडवरील अक्षय जैन यांच्या मालकीच्या मोबाईल दुकानात अज्ञात चोरट्यांनी जवळपास ५० हजार रुपयांचे मोबाईल दुकान फोडून लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पाचोरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या आदेशाने एपीआय राहुल मोरे, पीएसआय विकास पाटील,गणेश चौबे यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी राहुल बेहेरे, मल्हार देशमुख, विनोद बेलदार,नरेंद्र नरवाडे यांनी सूत्रांच्या माध्यमातून शोध घेतला असता सदर आरोपीला अटक करून पाचोरा पोलिसात गु.र.न. 78/2022 भादवि कलम 457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन- पाटील यांच्या आदेशाने सहायक फौजदार विनोद शिंदे करीत आहेत .या कार्यवाही बाबत पाचोरा पोलिसांचे सर्वत्र व्यापारी वर्गाच्या वतीने कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे