अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेऊन भातकुडगावच्या जगदंबा हॉटेल मध्ये लैंगिक अत्याचार, आरोपीला सहादिवसांची पोलीस कोठडी
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेऊन भातकुडगावच्या जगदंबा हाॅटेलमध्ये लैंगिक अत्याचाराची घटना घडली असून शेवगाव पोलिसांनी सहा तासांच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या बाबत मिळालेली माहिती अशी की शेवगाव पोलिस स्टेशनला दिनांक ४ जून २०२५ रोजी शेवगाव शहरातील वडार गल्लीत राहणाऱ्या ३६ वर्षीय महीलेने फिर्याद दाखल केली आहे. त्या दाखल फिर्यादीत असे नमूद करण्यात आले आहे की संशयित आरोपी आकाश सोमनाथ गिरम वय (२५ वर्षे), राहणार शहर टाकळी ,तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर यांनी फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आणि प्रेमाचे आमिष दाखवून दिनांक १ जून २०२५ रोजी आणि आई वडिलांच्या कायदेशीर रखवालीतून बळजबरीने पळवून नेऊन आरोपी काम करीत असलेल्या शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील जगदंबा हॉटेल येथे घेऊन गेला.व तेथे पिडीतेस चार दिवस नजर कैदेत ठेवले. तक्रारदार हे शेवगाव पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी जाणार आहेत असे आरोपीस समजल्याने संशयित आरोपी आकाश सोमनाथ गिरम, राहणार-शहरटाकळी तालुका-शेवगाव, जिल्हा-अहिल्यानगर यांने पिडीतेस दिनांक ४ जून २०२५ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेवगाव पोलिस स्टेशनच्या आवारात आणून सोडले.अशा आशयाच्या फिर्यादी वरून शेवगाव पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ५०३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७(२),८७ पोक्सो कायदा कलम १२ या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग व्ही.सुंदरडे यांच्या कडे देण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांनी सदर गुन्ह्याच्या तपासासाठी एक तपास पथक नेमले होते.सदर तपासी पथकाने आरोपीस गुन्हा दाखल झाल्यापासून सहा तासांच्या आत गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेऊन त्यांस व शहर टाकळी येथुन ताब्यात घेऊन शेवगाव पोलिस स्टेशनला आणून अटक केली होती.तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांनी पिडीत मुलीला विश्वासात घेऊन तीचा जबाब नोंदवला असता पिडीत मुलीने सदर गुन्ह्यातील संशयित आरोपीने तीच्या सोबत मागिल दोन महिन्या पासून भातकुडगावच्या जगदंबा हॉटेल येथे बऱ्याच वेळा प्रेमाचे व लग्नाचे आमिष दाखवून तीच्या सोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे सांगितले आहे.तसेच एक वर्षापूर्वी पिडीतेच्या आई-वडिलांनी पिडीतेचे लग्न धुळे येथील एका मुलांसोबत लावून दिले असल्याचे पिडीतेने पोलीसांना दिलेल्या जबाबात सांगितल्याने सदर गुन्ह्यात अल्पवयीन पिडीतेच्या जबाबा वरून वाढीव भारतीय न्याय संहिता कलम ६४(२),(आय)(एम),६५(१), तसेच पोस्को कलम ४.५(एल).६.८, तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६,कलम १०,११ प्रमाणे समाविष्ट करण्यात आले असून पिडीतेचे आई-वडिल, आणि सासु-सासरे तसेच पती यांना देखील सह आरोपी बनवण्यात आले आहे.पिडीतेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपीस दिनांक ५ जून २०२५ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता माननिय न्यायालयाने आरोपीस १० जून पर्यंत पोलिस कोठडीतील रिमांड मंजूर केला आहे. सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक समाधान नागरे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे,पोलिस उपनिरीक्षक महाले, पोलिस हेड कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल शाम गुंजाळ, कृष्णा मोरे आठरे, यांनी केली आहे.वरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत.