पाचोऱ्यात कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवशी पक्ष प्रवेश उत्साहात

पाचोऱ्यात कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवशी पक्ष प्रवेश उत्साहात

पाचोरा (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पक्ष प्रवेश घेण्यात आला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील सेवानिवृत्त नायबतहसिलदार मनसुब राठोड, प्रसिद्ध शायर अमजद खान, प्रदीप चव्हाण, यांचा प्रवेश जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष श्री पवार यांना तालुका कॉग्रेस च्या वतीने केक कापुन शाल व पुष्पगुच्छ सह नगरी टोपी घालून तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ओ. बी. सी. सेल चे तालुका अध्यक्ष इरफान मनियार, जिल्हा ओबीसी प्रदीप चौधरी, अॅड. वशिम बागवान, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, युवक तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, एन एस यु आय चे आशुतोष पवार, शंकर सोनवणे, ओबीसी शहर अध्यक्ष शरीफ शेख सय्यद कमरअली, मौसिन पठाण, रवी सुरवाडे आदि उपस्थितीत होते