जिल्हा परिषद शाळेत चंद्रयान क्विज व बक्षीस वितरण कार्यक्रम साजरा
शिक्षकांची कमतरता या समस्येतून झुंजनारी व या समस्याला समितीच्या सहाय्याने मात करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या प्रयत्न करणारी जि प उर्दू शाळा पिंपळगाव हरेश्वर येथे चंद्रयान-3 क्विज चा आयोजन शाळेचे शिक्षकाकडून करण्यात आला. या उपक्रमच्या उद्देश विद्यार्थी मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे व कृतीच्या माध्यमातून विद्यार्थी मध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण करणे हे होता. प्रश्नमंजुषा मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम, द्वितीय व तिसरा क्रमांक पटकावणारे विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली. कार्यक्रमचे अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक अब्दुल सत्तार हे होते. कार्यक्रमचे उद्दिष्ट शेख जावेद रहीम यांनी मांडले. आपला देश भारत स्पेस रिसर्च व सॅटॅलाइट लॉन्च मध्ये अग्रिम आहे व शक्तिशाली बनत आहे. आपणही शिक्षण घेऊन आपल्या देशाला मजबूत बनवणे व देशाची प्रगती मध्ये सहभाग घ्यावे असे आवाहन अध्यक्ष शेख तालीम यांच्याकडून करण्यात आले. कार्यक्रम मध्ये शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख तालीब कुतबोद्दीन, अब्दुल सत्तार, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य इमरान शाह,खलील शेख, हाफीज सुलेमान, मुस्तकीम शेख, गूफरान शेख,अलीम शेख, कय्यूम खान, अश्फाक अन्सारी, आदिल शाह, जावेद रहीम आदी उपस्थित होते. या रोजी शिक्षक दिवस असून समिती मार्फत शिक्षकांचे सत्कार ही करण्यात आले.