आखतवाडे उपसरपंच श्री दिपक गढरी अखेर पात्र घोषित जिल्हाधिकारी जळगाव यांचा निकाल पारित

आखतवाडे उपसरपंच श्री दिपक गढरी अखेर पात्र घोषित जिल्हाधिकारी जळगाव यांचा निकाल पारित

आखतवाडे ता पाचोरा येथील उपसरपंच श्री दिपक गढरी यांच्या विरोधात अर्जदार मुरलीधर निंबा परदेशी यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे अतिक्रमणाबाबत सदस्य पद रद्द करण्यासाठी दिनांक 27/12/2022/ रोजी अर्ज दाखल केला होता त्या नंतर जिल्हाधिकारी जळगाव यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे वेळीवेळी सुना्वनी घेऊन गटविकास अधिकारी पाचोरा तहसीलदार पाचोरा व संबंधीत विभागाकडून चॊकशी अहवाला मागवला त्या अहवालात अतिक्रमण नसल्याचे आढळून न आल्याने दिनांक 26/12/2023/रोजी जिल्हाधिकारी जळगाव मा आयुषजी प्रसाद यांनी आखतवाडे उपसरपंच श्री दिपक गढरी यांच्या बाजूने निकाल देत त्यांना सदस्य पदासाठी कायम केले असून दिपक गढरी यांच्या बाजूने एडवोकेट वसंत भोलाणकर यांनी काम पहिले तर अर्जदार मुरलीधर परदेशी यांच्या तर्फे विश्वासराव भोसले व सचिन देशपांडे यांनी काम पाहिले

विकासाचा रथ असाच धावत राहणार दिपक गढरी उपसरपंच आखतवाडे

गेली एक वर्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुनावणी व अन्य चौकशीना सामोरे जावे लागले तरी सुद्धा मी न खचता आम्ही विकास रथ सुरूच ठेवला व या पुढे सुद्धा अगदी जोमाने विकास कामे करून गावातील सर्व समाजाला न्याय देण्यास पर्यंतशील राहू असे दिपक गढरी यांनी सांगितले.