पाचोरा तहसील कार्यालयात ग्राहक जनजागृती कार्यक्रम उत्साहात

पाचोरा तहसील कार्यालयात ग्राहक जनजागृती कार्यक्रम उत्साहात

पाचोरा ( प्रतिनिधी) येथील महसूल विभाग तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटना यांच्या संयुक्त विद्यमान आज दिनांक 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी घ्यावयाची काळजी , मालाची गुणवत्ता व एक्सपायरी डेट बाबत सतर्कता, ऑनलाइन व ऑफलाइन फसवणुकीपासून ची सावधानता, आणि फसवणूक झाल्यास उपलब्ध असलेली ऑनलाइन व ऑफलाइन तक्रारीची सुविधा याबाबतचे मंथन यावेळी करण्यात आले.

पाचोरा तहसील कार्यालयातील सभागृहात निवासी नायब तहसीलदार बी.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष चिंधू मोकल, सचिव संजय पाटील, तालुका संघटक शरद गीते, विधी सेवा सदस्य ॲड निलेश सूर्यवंशी, ॲड. स्वप्निल पाटील,ॲड सचिन देशपांडे, तालुका बांधकाम समिती अध्यक्ष प्रा. शिवाजी शिंदे, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे शहर अध्यक्ष सलीम रंगरेज, पुरवठा अधिकारी अभिजीत येवले, वजनमापे निरीक्षक विनोद सभादंडे, आर. आर. मराठे, सुधाकर पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला निवासी नायब तहसीलदार बी.डी. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प दिन स्वागत केले. याप्रसंगी शरद गीते, प्रा. शिवाजी शिंदे, गिरीश दुसाने यांनी ग्राहक जनजागृती विषय मनोगत व्यक्त केले. वजन माप निरीक्षक विनोद सभादंडे यांनी सभागृहात प्रचलित वजन व मापे यांचे प्रदर्शन सादर करत वजन मापांची सत्यता, गुणवत्ता व प्रमाणीकरण याविषयी सभागृहाला अवगत केले. नायब तहसीलदार बी.डी. पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी केंद्र शासनातर्फे नोटरी पदी नियुक्त करण्यात आलेले ॲड निलेश सूर्यवंशी, ॲड. स्वप्निल पाटील,ॲड सचिन देशपांडे या विधी सेवा सदस्यांचा सन्मान नायब तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आला. पुरवठा अधिकारी अभिजीत येवले यांनी प्रास्ताविक सूत्रसंचालन केले. संजय पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.