जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त शिव व्याख्याते संजीव सोनवणे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन

जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त
शिव व्याख्याते संजीव सोनवणे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन

जळगाव (जिमाका) दि. 24 – राजर्षी शाहू महाराज यांची जयंती राज्यभर सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे. सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे चोपडा येथील शिव व्याख्याते संजीव सोनवणे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवव्याख्याते श्री. संजीव सोनवणे पाटील हे त्यांच्या व्याख्यानात सामाजिक न्याय आणि शाहू महाराज या विषयाबरोबरच शाहू महाराजांनी घेतलेले सामाजिक न्यायाचे निर्णय आदिंबाबतची माहिती आपल्या व्याख्यानात देणार आहेत.
हे व्याख्यान जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव च्या https://www.facebook.com/jalgaon.dio/ या फेसबुक पेजवरुन शुक्रवार, 25 जून, 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता लाईव्ह प्रसारण करण्यात येणार आहे. नागरीकांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.