ईदच्या दिवशी शिरखुर्मा साठी 650 रुपये ची 80 गरीबांना किराणा किटचे वाटप भडगाव पोलिस स्टेशनचा उपक्रम

ईदच्या दिवशी शिरखुर्मा साठी 650 रुपये ची 80 गरीबांना किराणा किटचे वाटप
भडगाव पोलिस स्टेशनचा उपक्रम

आज भडगाव पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक अशोक ऊतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रमजान निमित्ताने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इफतार पार्टीचे आयोजन न करता येथील मुस्लिम समाजातील 80 गरीब नागरिकांना पोलीस स्टेशनला बोलून रमजान ईदच्या दिवशी शीरखुर्मा तयार करण्यासाठी लागणारी आवश्यक किराणा किट वाटप करण्यात आली. तसेच किराणा किटमध्ये एक किलो तेल ,एक किलो साखर, कोबरा काजू बदाम असे साडेसहाशे रुपये किमतीचे किराणा साहित्य सुमारे 80 गरिबांना वाटप करण्यात आला या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची सर्वञ कौतुक केले जात आहे. अशा प्रकारे गरिबांना किराणा किटचे वाटप करण्याचे कार्यक्रमामुळे भडगाव पोलिसांनी माणुसकी चे दर्शन घडविले आहे.भडगाव पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची सर्वञ कौतुक केले जात असुनह भडगाव शहरातील व तालुक्यातील नागरिक तर्फे भडगाव पोलीस स्टेशन चे कौतुक होत आहे वेळी भडगाव पोलीस स्टेशन चे पि एस आय.एस.पी. पटाईत , पी ए आय.सुनील सोनवणे ,गोपनीय विभागाचे लक्ष्मण पाटील, हिरा पाटील, सोनवणे होमगार्ड शब्बीर शेख, महाजन हवलदार ईश्वर पाटील पोलीस कर्मचारी व मुस्लिम पंच कमिटीतील सोने खाटीक, शकील शेख ,अल्ताफ खाटीक ,अबरल मिझो मजर अली अरशद बेग मिझो ईलीयस मिझो यूनूस खान ईमरान सैय्यद खालील शेख सलावदीन शेख ईकबाल मोनियर ईदरीस कूरेशी ईसाक मलिक जाकीर कूरेशी मूस्तफ खान व नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील तर आभार पीएसआय सोनवणे यांनी मानले