तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेतील यशस्वीतांचा गो.पु.पाटील,महाविद्यालयात कौतुक सोहळा संपन्न

तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेतील यशस्वीतांचा गो.पु.पाटील,महाविद्यालयात कौतुक सोहळा संपन्न….!!!!

*भडगाव (प्रतिनिधी) -* कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत व,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय व भडगाव तालुका क्रीडा समितीतर्फे आयोजीत भडगाव तालुकास्तरीय ॲथलेटिक्स (मैदानी) स्पर्धेत सांघिक विजेतेपद प्राप्त करणाऱ्या १९ व १७ वर्षाआतील खेळाडूंचा कौतुळा सोहळा नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,प्र.प्राचार्य संदीप बाविस्कर यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी आर.एस.कुंभार,बी.डी.साळुंखे,एस.ए.वाघ,आबासाहेब कोळगावकर,सुर्यकांत पाटील,किरण पाटील,व्ही.पी.सोनवणे,डी.एन.पाटील,राहुल सोनवणे,योगेश बोरसे,पी.यु.पाटील,निलेश पाटील,दिनकर सुर्यवंशी,प्रवीण निकम,राहुल नेरपगार,नरेंद्र भोसले,सिमा शिसोदे,सोनाली सोनवणे,चारुलता पाटील,सरिता पाटील,तृप्ती पाटील,मनोज पाटील,दत्तात्रय भोसले,रामदास पाटील,चेतन पवार,चेतन पाटील,प्रेमचंद चौधरी आदि शिक्षक-शिक्षकेतर,प्राध्यापक-प्राध्यापिका उपस्थित होते,उपस्थितांनी खेळाडूंना अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.