राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत गोपीचंद पुना पाटील,विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा स्वराज चौधरी यास रौप्यपदक…!!!!!!
कोळगाव ता.भडगाव (वार्ताहर) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत, गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील तथा किसान स्पोर्ट्स अकॕडमीचे खेळाडू चि.स्वराज प्रल्हाद चौधरी (ग्रीकोरोमन ६५ किलो,द्वितीय) तसेच कु. तनु वाल्मीक पाटील (४९ किलो,चतुर्थ) यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी,कार्यालय, रायगड तर्फे, काशी स्पोर्ट्स सेंटर,खोपोली ता.खालापूर जि.रायगड येथे आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत यश संपादन केले आहे.
स्पर्धेत यश मिळवणाऱ्या कुस्तीपटूंना पैलवान प्रल्हाद चौधरी,पैलवान सयाजी मदने, प्रा.रघुनाथ पाटील,आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन तथा जिल्हा बँक संचालक आदरणीय नानासाहेब प्रतापराव पाटील,संस्थेच्या सचिव तथा दूध फेडरेशनच्या संचालिका डॉ.पुनमताई पाटील,मंत्रालय सचिव प्रशांतराव पाटील,प्राचार्य अनिल पवार, पर्यवेक्षिका सिमा शिसोदे तसेच शिक्षक-शिक्षकेतर,प्राध्यापक-प्राध्यापिका आदिंनी आनंद व्यक्त करीत व अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

























