पावसाच्या पुनरागमनासाठी मा. वैशालीताई सुर्यवंशी यांनी केला शिव मंदिरात अभिषेक

पावसाच्या पुनरागमनासाठी मा. वैशालीताई सुर्यवंशी यांनी केला शिव मंदिरात अभिषेक…!

*पाचोरा:* आज दि. 04/09/2023 रोजी ताईसो. वैशाली सुर्यवंशी व नरेंद्रसिंग सुर्यवंशी उभयता यांच्या हस्ते महादेव मंदिरात सर्व पदाधिकाऱ्यांसोबत पावसाच्या पुनरागमनासाठी महाआरती व अभिषेक संपन्न झाला. गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.बळीराजा संकटात सापडलेला आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे, गुराढोरांच्या चारा प्रश्न निर्माण झाला आहे, विहिरी, तलावातील पाणीसाठा अत्यल्प झाला आहे. पुढील रब्बी हंगाम देखील धोक्यात आला आहे. माझा बळीराजा तर आभाळाकडे आस लागून रोज पावसाची वाट बघतोय. या सर्व गोष्टींचा विचार करून शिव मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या शुभप्रसंगी जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शहर प्रमुख अनिल सावंत, पप्पू राजपूत, राजेंद्र राणा, दादाभाऊ चौधरी, उपजिल्हा संघटिका तिलात्तमा मौर्य, सौ मंदाकिनी पारोचे, आनंद सांगवी, पप्पू जाधव, मिलिंद पटवारी, युवा सेना शहर प्रमुख मनोज चौधरी, भरत खंडेलवाल, अभिषेक खंडेलवाल, बापू वाणी सर, जे के पाटील, रतन परदेशी, सुधाकर महाजन, संजय चौधरी, खंडू सोनवणे, निखिल सोनवणे, आनंद पारोचे, कैलास चौधरी, प्रवीण पाटील, नाना चौधरी, नाना वाघ, संतोष पाटील सर, एडवोकेट किशोर पाटील, धरमसिंग पाटील, राजू गायकवाड, गोकुल गांगुर्डे, दिलीप कासार, प्रवीण वाघ, मयूर मोरे, गौरव पाटील, शुभम राजपूत सह समस्त पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक व शिवभक्त उपस्थित होते