मोहोज ते चिचोंडी रस्त्याची दयनीय अवस्था,सहा महिन्यांपुर्वी केलेल्या रस्ता डांबरीकरणाचे तिनतेरा वाजले,क्वालीटी कंट्रोल विभागा मार्फत अनेक गावांतील कामाची तपासणी करण्याची प्रवाशांची मागणी

मोहोज ते चिचोंडी रस्त्याची दयनीय अवस्था,सहा महिन्यांपुर्वी केलेल्या रस्ता डांबरीकरणाचे तिनतेरा वाजले,क्वालीटी कंट्रोल विभागा मार्फत अनेक गावांतील कामाची तपासणी करण्याची प्रवाशांची मागणी

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) केंद्रिय रस्ते विकास मंत्री नामदार नितिनजी गडकरी साहेब सांगतात देशातील रस्ते हे चकचकीत आणि गुळगुळीत झाले पाहिजे.काम केलेल्या ठेकेदाराकडे सदर रस्त्याच्या देखभालीसाठी पाच वर्षे जबाबदारी असते.पण अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक रस्ते हे डांबरीकण केल्यानंतर सहा महिन्यांतच उखडली जातात त्यामुळे प्रत्येक गावातील रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासणी करूनच संबंधित ठेकेदाराची बीले अदा करण्यात यावी अशी सर्व सामान्य जनतेतून मागणी होत आहे.अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील अनेक रस्ते हे डांबरीकरण केल्यानंतर सहा महिन्यांतच उखडले गेले आहेत असे निदर्शनास येत आहे.जोडमोहोज ते शिराळ चिचोंडी या रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांपासून रस्ता दुरूस्तीचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामात डांबर न वापरता फक्त रस्त्यावर कच खडी टाकून देऊन थातूरमातूर काम केले आहे. रस्त्यावरील खडी ही उघडी पडली आहे.रस्त्यावरील कामात डांबर नसल्याने अजिबात पारदर्शकता दिसत नाही.शालेय विद्यार्थी प्रवासी यांना या रस्त्यावर चालताना अतिशय कसरत करावी लागत आहे.नाशिक येथील गुणवत्ता नियंत्रण विभागाने या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासणी केली पाहिजे अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. या रस्त्याच्या कामात आमदार मोनिकाताई राजळे आणि पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालून या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी केली जात आहे.ठेकेदारांच्या चालढकल धोरणामुळे या रस्त्यावर अनेक वेळा अपघात झाले आहेत.तिसगाव ते कासार पिंपळगाव,ढवळे वाडी फाटा या रस्त्याच्या कामाचे सहा महिन्यांतच तिनतेरा वाजले आहेत.या रस्त्यावरील आडनदीवर चार महीन्यापुर्वी बांधलेला पुल पावसाच्या पहील्या पाण्यातच वाहुन गेला आहे.अनेक ठिकाणी डांबरीकरण न करताच रस्ता पुर्ण केला आहे. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या कासार पिंपळगावातील स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर कच खडी न वापरल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.गावाच्या प्रवेश द्वाराजवळ असलेल्या मागासवर्गीय स्मशानभूमी जवळ तर रस्ता डांबरीकरणच करण्यात आलेला नाही.सारा कारभार कसा बिनबोभाट पणे आणि संशयास्पद रीतीने सुरू आहे.आमदार मोनिकाताई राजळे यांनी तिसगावातून निघणाऱ्या कवळे वस्ती मार्गाने प्रवास करून थेट ढवळेवाडी फाट्यावर जाऊन हा रस्ता प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सर्व बाबी त्यांच्या लक्षात येतील.व्रुद्धेश्वर साखर कारखाना ते हनुमान टाकळी- कोपरे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.साखर कारखान्याकडे उसाने भरलेल्या गाड्या येण्यासाठी अनेक ठिकाणी अपघात सद्रूष्य परीस्थिती निर्माण झाल्याने गाड्यांना अनेक अडचणी येत आहेत.हनुमान टाकळी ते कोपरे रस्त्याचे काम गेल्या एक वर्षापासून कासवाच्या गतीने सुरू आहे त्या कामातही आमदार ताईंनी लक्ष घालून हा रस्ता पारदर्शक कसा होईल हे आवर्जून तपासूण पहावे अशी या भागातील सर्व सामान्य मतदारांची मागणी आहे.वडुले ते ढोरजळगाव या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.ढोर जळगावात प्रवेश करताना तर गावातील रस्ता डांबरीकरण न करताच तसाच ठेवला आहे.त्या ठीकाणी गटारं निर्माण झाली आहेत.जवखेडे खालसा ते वाघोली या रस्त्याच्या कामासाठी आमदार मोनिकाताई राजळे यांनी तिनं वेळा निधी उपलब्ध करून दिला होता तरीही फक्त अर्धा किलोमीटर अंतरावरच डांबरीकरण करून या रस्त्याच्या कामाची बोगस बीले काढण्यात आली आहेत.या रस्त्याच्या कामात स्वतः आमदार मोनिकाताई राजळे यांनी लक्ष घालून चौकशी करावी आणि थेट वाघोली पर्यंत डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे.पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.निक्रुष्ठ दर्जाच्या पद्धतीने रस्त्याची काम करणाऱ्या आणि बोगस बीले काढणाऱ्या निर्ढावलेल्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे.आणि त्यांनी केलेल्या अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरील कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागा मार्फत तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.अशी परीस्थिती मतदार संघातील अनेक गावांत दिसून येत आहे.