कुर्बान नगर येथील मुस्लिम बांधवांचा मा. सौ. वैशाली सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश

कुर्बान नगर येथील मुस्लिम बांधवांचा मा. सौ. वैशाली सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश…!

पाचोरा- शहरातील कुर्बान नगर येथील मुस्लिम बांधवांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मा. सौ. वैशाली सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.पक्षात प्रवेश केलेल्या सर्व मुस्लिम बांधवांचे सौ. वैशाली सुर्यवंशी यांनी स्वागत केले.पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करून पक्ष मजबुतीसाठी आपण सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे असे सांगून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कुर्बान नगर येथील मुसुफ शेख, शेरज,नजीर, गफ्फार कुरेशी, शफिक पिंजारी, सय्यद नाजीम, अरबाज पिंजारी, सलमान शाह, परवेज पिंजारी, शोएब कुरेशी, सय्यद लाल, अश्फाक पिंजारी, साहिल पिंजारी, इसराइल पटेल यांनी पक्षप्रवेश केला.
याप्रसंगी शहर प्रमुख श्री. अनिल सावंत, भरत भाऊ खंडेलवाल, युवा सेना शहरप्रमुख श्री.मनोज चौधरी, शहर संघटक श्री. राजेंद्र राणा, श्री.अभिषेक खंडेलवाल, श्री. संजय चौधरी, श्री.नाना चौधरी, श्री. नितीन चौधरी, श्री. गोपाल चौधरी, सय्यद गफ्फार तसेच शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.