एस.एस.एम.एम.महाविद्यालय येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त युवती प्रबोधिनी कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित एस.एस.एम.एम.महाविद्यालय पाचोरा येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त दिनांक 13/08/2022 वार शनिवार रोजी युवती प्रबोधिनी कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता .
युवती प्रबोधिनी उद्घाटन प्रसंगी आदरणीय सौ.प्रतिभा ताई चावडे उपस्थित होत्या .कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा नगरपालिकेच्या नगरसेविका आदरणीय सौ. सुचेता ताई वाघ,तनिष्का गटप्रमुख आदरणीय सौ. ज्योती ताई वाघ ,गायत्री परिवारातील सदस्य आदरणीय सौ.सुरेखा ताई खानोरे ,सौ. अस्लेषा ताई निगडे ,सौ. प्रणेता ताई येवले ,त्याचबरोबर आदरणीय वाघ मॅडम उपस्थित होत्या .
आदरणीय सौ .सुरेखाताई खानोरे यांनी युवतींना आपल्या जीवनात विविध असे मार्गदर्शक तत्वे कसे अवलंबावे ,आपल्या जीवनातील कठीण प्रसंगांना कसे सामोरे जावे या संदर्भात मार्गदर्शन केले .आदरणीय सौ.प्रणेता येवले यांनी झाशीच्या राणीचे आपल्या देशासाठी असलेले महत्त्वाचे योगदान वर्णन केले त्याचबरोबर ऐतिहासिक घटनांमधून युवतींनी आपल्या जीवनात कसे अनुकरण करावे याबाबत विश्लेषण केले .कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय सौ.प्रतिभा ताई चावडे यांनी बदलत्या युगा नुसार अंधश्रद्धेच्या आहारी न जाता आपल्या जीवनात आधुनिकीकरणाचा योग्य अवलंब कसा करावा या संदर्भात मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका श्रीमती वासंती चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका श्रीमती मनीषा चव्हाण व आभार प्रदर्शन प्राध्यापिका श्रीमती मनीषा पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय प्राध्यापक डॉ. वासुदेवजी वले ,महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. जे.व्ही.पाटील ,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य माननीय प्राध्यापक जी.बी.पाटील ,व पर्यवेक्षक माननीय प्राध्यापक एस. एम. पाटील उपस्थित होते .
युवती प्रबोधिनी उद्घाटन प्रसंगी प्राध्यापिका डॉ. श्रीमती सुनीता गुंजाळ ,श्रीमती सुनिता सोहत्रे, श्रीमती मनीषा माळी ,श्रीमती विजया देसले ,श्रीमती छाया पाटील, श्रीमती सुजाता पवार व श्रीमती नूतन पाटील या सर्व प्राध्यापिका उपस्थित होत्या .कार्यक्रम पार पाडण्यात या सर्व प्राध्यापिकांचे विशेष असे सहकार्य लाभले .त्याचबरोबर कार्यक्रमास प्राध्यापक बंधू व शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील सहकार्य लाभले .