आई वडिलांची मिळाली साथ म्हणूनच धनश्री कुलकर्णी हीला मिळाला दिल्लीच्या इंडिया सिंगिंग सुपरस्टार येथे भाग घेऊन गायन मध्ये मिळवला पहिला मान

आई वडिलांची मिळाली साथ म्हणूनच धनश्री कुलकर्णी हीला मिळाला दिल्लीच्या इंडिया सिंगिंग सुपरस्टार येथे भाग घेऊन गायन मध्ये मिळवला पहिला मान

पाचोरा येथील सोनार गल्लीतील विनोद कुलकर्णी यांची कन्या धनश्री कुलकर्णी व सिध्दी कुलकर्णी यांना लहानपणापासून गायन करण्याचा शौक असून पाचोरा शहरात कुठलेही कार्यक्रम असो प्रत्येक ठिकाणी आवर्जून भाग घ्यायच्या शाळेत असो किंवा इतर कुठेही प्रोग्राम असो हिरारीने भाग घेत असे धनश्री कुलकर्णी तिचे वडील विनोद कुलकर्णी हे सुद्धा एक चांगले गायक असून त्यांनी पाचोरा शहरातील अनेक ठिकाणी प्रोग्राम घेऊन उत्कृष्ट गाणे म्हणून नाव लौकिक केले आहे तसेच उत्कृष्ट व विनोदी कलाकार म्हणून त्यांनी सूत्रसंचालनाची कामगिरी व्यवस्थित पार पाडतात धनश्री कुलकर्णी तिच्या आई-वडिलांनी साथ दिली म्हणून आज ती उत्कृष्ट गायिका म्हणून आज ती या शिखरावर पोहोचली धनश्री कुलकर्णी आपल्या चांगल्या आवाजाच्या जोरावर तिने गायनामध्ये अनेक पुरस्कार मिळवले दिल्ली मधील इंडिया टीव्ही मार्फत भारतातील मुलींकरता गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या मध्ये पाचोरा येथील धनश्री कुलकर्णी भाग घेतला यामध्ये अनेक राज्यातील मुलींनीही भाग घेतला त्यामध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल राजस्थान पंजाब दिल्ली आसाम बिहार मध्य प्रदेश अशा अनेक राज्यातून मुलींनी स्पर्धेत भाग घेतला या स्पर्धेतून प्रथम एकूण 20 स्पर्धक घेण्यात आले त्यानंतर टॉप 16 स्पर्धक निवडले त्यातून एकाची निवड सुपरस्टार म्हणून निवड करायची होती यावेळी धनश्री कुलकर्णी या मुलीला सुंदर आवाजात व तालावर उत्तम प्रकारे गाणे म्हणून तिचे गाणे ऐकून सर्व भावुक झाले व दिल्ली येथील एका वाहिनी वरील दिल्लीच्या इंडिया सिंगिंग सुपरस्टार या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल धनश्री कुलकर्णीला पुरस्कार व रोख 50 हजार रुपये असे देण्यात आले या तिच्या उत्कृष्ट गायनामुळे पाचोरा शहरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे सिद्धि टॉप 10 मध्ये आली धनश्री एक उत्कृष्ट गायिका म्हणून तिचे नाव लौकिक होत असून यामागे तिच्या आई-वडिलांची मिळाली साथ.
पाचोरा येथील सामाजिक महिला कार्यकर्ता तसेच महाराष्ट्र राज्याच्या पाचोरा तालुका महिला सुरक्षा संघटना जिल्हा अध्यक्षा सौ ललिता पाटील तालुका अध्यक्षा सौ सरला पाटील तालुका उपाध्यक्ष सौ प्राध्यापक वैशाली बोरकर सचिव वैशाली जडे यांनी सत्कार केला